School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या आठ तासांपासून ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांची गिरीश महाजन यांनी भेट घेतली. यावेळी आंदोलकांपैकी एका महिलेने गिरीश महाजन यांना सवाल केला की या ठिकाणी ” तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं ? ” असा सवाल करताच सर्व आंदोलकांनी एकच घोषणा करत आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी केली. तर आंदोलकांची भूमिका आहे तीच सरकारची देखील आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल. त्यामुळे सर्व आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले. तर गेल्या आठ तासांपासून आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून रेल रोको आंदोलन सुरू ठेवले आहे. या सर्व आंदोलकांची सरकार प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती सर्व आंदोलकांना केली. तर या रेल रोके मुळे अनेक रुग्ण, महिला रेल्वे प्रवासात अडकून पडले आहेत. त्यांच्या दृष्टीने विचार करून रेल रोको थांबवावे, असे आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच तुम्हाला जे हवं तेच होणार कृपया आंदोलन थांबवा. दिरंगाई करणाऱ्या सर्व पोलिसांवर कारवाई होणार. कारवाईत कुचराई करणाऱ्या पोलिसांचं निलंबन केले जाणार असून आंदोलनाची भूमिका तीच सरकारची भूमिका असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचं प्रकरणाकडे लक्ष असून कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा >>>बदलापूर-कर्जत रेल्वे वाहतूक ठप्पच, सहा तासानंतरही ठिय्या आंदोलन कायम

आंदोलक अधिक आक्रमक

आज ज्या मुलींसोबत गैरकृत्य झाले त्या मुलींच्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केले असते. असा संतप्त सवाल आंदोलनातील एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना केला. यावेळी तुम्हाला हवे असेल तर मी इथून जातो मात्र तुम्ही आंदोलन मागे घ्या आणि रेल रोको थांबवा असे आवाहन गिरीश महाजन  यांनी आंदोलकांना केले. तर आंदोलकांनी अधिक आक्रोश करत सरकारने तातडीने आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली.