कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत दाटीवाटीच्या ठिकाणी, वर्दळीच्या भागात आहे. या भागात नव्याने न्यायालय इमारतींची उभारणी करताना आवश्यक सुविधा देताना अनेक अडथळे येतील. वाहनतळासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करणे अवघड होईल. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील बारावे येथील पाच हेक्टर जागेत न्यायालयाची नवीन प्रशस्त इमारत उभारणे सोयीस्कर होणार आहे, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे विभागातील अभियंत्यांनी तज्ज्ञ वास्तुविशारदांशी चर्चा करून शासनाला पाठविला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील न्यायालयाच्या आवारातील जुनी दगडी इमारत १२७ वर्षापूर्वीची आहे. मुख्य न्यायालय इमारत आणि जलदगती न्यायालय इमारत अनुक्रमे ५० आणि २० वर्षाच्या आहेत. न्यायालयाच्या एकूण जागेचे क्षेत्रफळ नऊ हजार ६४५ चौरस मीटर आहे. या न्यायालयात २१ न्यायदान कक्ष आहेत. दाटीवाटीने आवारात वाहने उभी केली जातात. न्यायालयाच्या काही इमारती दगडी, कौलारू, पत्र्यांच्या आहेत. पावसाळ्यात या इमारती गळतात. जुन्या इमारतींची पडझड झाली आहे. स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे.

laxmi vilas palace gujarat
Laxmi Vilas Palace: मराठी राजाने बांधलेला जगातील सर्वात मोठा राजवाडा गुजरातमध्ये; जाणून घ्या इतिहास
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
Nagpur, food vendors Nagpur, Traffic congestion Nagpur, food vendors encroachment Nagpur,
नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
Leaders do not come to ask for votes banners at Pangul Colony in Nagpur
नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक
Hindu temple being rebuilt in Pakistan
पाकिस्तानात होणार हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार; एक कोटींचा निधी केला मंजूर, पाकिस्तानच्या या निर्णयामागील हेतू काय?

हेही वाचा… ठाण्यातील प्रमुख रस्त्यांसह झोपडपट्ट्यांमध्ये कंटनेर शौचालये, ३० ठिकाणी शौचालयांची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

वकील प्रतीक्षा दालने प्रशस्त करणे गरजेचे आहे, असे बांधकाम विभागाने अहवालात म्हटले आहे. काही वर्षांपासून कल्याण न्यायालयाच्या पुनर्विकासाची मागणी वकील संघटनांकडून शासनाकडे केली जात आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या विकास आराखड्यात बारावे येथे न्यायालय इमारतीसाठी पाच हेक्टरची जागा आहे. या जागेची ठाण्याच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ‘कडोंमपा”कडे मागणी केली आहे. ही जागा रेल्वे स्थानकांपासून दूर आहे. याठिकाणी वकील, अशिल, कर्मचाऱ्यांना जाणे त्रासदायक होणार आहे, अशी कारणे पुढे करत वकिलांनी बारावे येथील जागेला विरोध केला आहे. अस्तित्वातील जागेत न्यायालय इमारत उभारणीची मागणी सुरू ठेवली आहे.

हेही वाचा… ठाणे: अंतर्मुखता आणि बहिर्मुखता यामध्ये समतोल महत्त्वाचा – डॉ. आनंद नाडकर्णी

कल्याण न्यायालयाच्या जुन्या जागेत शासनाच्या प्रारूप मांडणी आराखड्यानुसार ४८ न्यायदान कक्ष, १४१ वाहनांसाठीचे वाहनतळ उभे राहू शकते. याठिकाणच्या बांधकामाला पालिकेकडून ३.६ चटई क्षेत्र निर्देशांक मिळू शकतो. या जागेत तळ अधिक तीन, तळ अधिक १४ मजले आणि वाहनतळासाठी तळ अधिक पाच माळ्याची इमारत उभ्या राहू शकतात. ही जागा दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने याठिकाणी नवीन वास्तू उभारणे भविष्याचा विचार करून अडचणीचे ठरणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कल्याण येथे सुमारे ६० नवीन न्यायदान कक्ष, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्याची मागणी केली आहे. जुन्या न्यायालयीन जागेची किंमत सुमारे २९ कोटी आहे. बारावे येथील पाच हेक्टर जागेत कार्यालयीन आणि निवासी इमारत उभारणे शक्य होणार आहे. ही जागा पालिकेच्या टिटवाळा, कल्याण, डोंबिवली वळण रस्त्यालगत आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी अहवालात म्हटले आहे.

“ कल्याण न्यायालयाच्या उभारणी संदर्भातील एक अहवाल शासनाकडे आला आहे. कल्याण न्यायालयातील वकिलांनी नवीन इमारत उभारणीचा प्रस्ताव शासनाला दिला तर हा विषय प्राधान्याने मार्गी लावला जाईल.” – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.