मोक्का गुन्ह्यातील आरोपी असलेल्या कल्याणमधील इराणी वस्तीतील दोन साखळी चोरांना ठाणे येथील मोक्का न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावासाची आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी तीन वर्ष शिक्षा भोगण्याचे आदेश विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- डोंबिवली: घरफोड्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

अजिज अब्बास उर्फ जाफर सैय्यद जाफरी (२०), जाफर आजम सय्यद (२८) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडताना ॲड. संजय मोरे यांनी सांगितले, जुलै २०२६ मध्ये मानपाडा लोढा हेरिटेज येथे राहणाऱ्या आशा पाटील (२९) व त्यांचे पती कल्याण पूर्व भागातील एका आजारी असलेल्या नातेवाईकाला बघण्यासाठी रिक्षेने चालल्या होत्या. मेट्रो माॅल येथून पायी जात होते. दुचाकीवरुन दोन जण आले त्यांनी आशा यांना पुढे जाऊ नका खून झाला आहे असे बोलून निघून गेले. पाठोपाठ दुसरी दुचाकी आली. त्यावरील दोघांपैकी एकाने आशा यांच्या मानेवर जोरदार थाप मारुन त्यांच्या गळ्यातील ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून कल्याणच्या दिशेने पळ काढला. पती, पत्नीने ओरडा केल्याने एका रिक्षा चालकाने दुसऱ्या दुचाकीवरुन पळणाऱ्या चोरट्यांना रिक्षा आडवी घातली. ते दोघेही दुचाकीवरुन रस्त्यावर पडले. पादचाऱ्यांनी पकडून त्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांची नावे अजिज अब्बास, जाफर आजम असल्याचे त्यांनी सांगितले. ते आंबिवली जवळील इराणी वस्तीत राहतात. ऐवज हिसकावून पळून गेलेले तौफिक इराणी, अब्बास इराणी असल्याची माहिती अटक आरोपींनी पोलिसांना दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

हेही वाचा- बदलापूर : सलग दुसऱ्या आठवड्यात वणवा सत्र; समाजकंटांनी वणवा लावल्याचा संशय

आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीखाली कारवाई करण्यात आली. ठाणे मोक्का न्यायालयाने १३ साक्षीदार तपासले. त्यात आरोपी दोषी आढळून आले. न्यायालयाने आरोपींवरील सर्व आरोप सिध्द होत नसल्याने त्यांना १० वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punishment of imprisonment to gold chain thieves who live in kalyans irani settlement dpj