भाईंदर : भाईंदरमध्ये एका कारखान्यात जमिनीवर लाटून पाणीपुरीच्या पुर्या तयार केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे.
हेही वाचा – ठाणे : दिव्यात ठाकरे गटाचा प्रभाग समितीवर मोर्चा, पाणीटंचाई समस्या दूर करण्याची मागणी
हेही वाचा – डोंबिवलीतील वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या जिवाला भूमाफियांकडून धोका
भाईंदरच्या आझाद नगरमध्ये असलेल्या एका कारखान्यात अस्वच्छ वाचावरणात पाणीपुरीसाठी लागणार्या पुर्या तयार केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे पदाधिकारी सचिन पोपळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये दृश्य कैद केले आहे. कामगार चक्क जमिनीवर पुर्या लाटत असताना आढळून आले आहेत. याबाबात शुक्रवारी ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने या कारखान्यावर धाड टाकली. सध्या कारखान्यातील साहित्याची पाहणी केली जात असून तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.