लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये २८४ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पाहाणी केली असून या दौऱ्यादरम्यान कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकाने रस्त्यांचे नमुने घेतले आहेत. रस्त्याचे नमुने घेण्यासाठी कोअर कटिंग यंत्राचा वापर करण्यात आला. हा तपासणी अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात २८४ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे गुणवत्तापुर्ण व्हावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे आग्रही असून त्यासाठी त्यांनी कामांची गुणवत्ता तपासणीचे निर्देश पालिकेला दिले होते. यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कामांची गुणवत्ता तपासणीसाठी मुंबई आयआयटी पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून रस्ते कामांची पाहाणी करण्यात येत असतानाच, या पथकाने आता रस्त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात केली आहे. या रस्ते कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पाहाणी केली. या दौऱ्यादरम्यान कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकाने रस्त्यांचे नमुने घेतले आहेत. रस्त्याचे नमुने घेण्यासाठी कोअर कटिंग यंत्राचा वापर करण्यात आला. हे नमुने मुंबई आयआयटीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आणखी वाचा-कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट दलालांची प्रवाशाला मारहाण
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी डांबर आणि काँक्रीट अशा दोन्ही रस्त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. नमुने म्हणजेच रस्त्याचा तुकडा. कोअर कटर यंत्राद्वारे हा तुकडा काढून घेऊन तो मुंबई आयआयटी प्रयोग शाळेमध्ये तपासला जाणार आहे. कोणत्याही रस्त्यांचे काम करताना विशिष्ट मातीचा थर त्यावर खडी आणि नंतर त्यावर डांबराचे थर चढवले जातात. हा थराची जाडी योग्य आहे का, याचे मोजमाप मोजपट्टीच्या सहाय्याने केले जाते. तसेच हा थर बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू दर्जेदार आहेत कि नाही याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. तिथे तपासणी केल्यानंतरच रस्त्यांचा दर्जा चांगला आहे किंवा वाईट याबाबत अंतिम अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे. या मूल्यमापन अहवालातून रस्त्यांचा खरा दर्जा ठाणेकरांना कळू शकणार आहे.