शहरातील मध्यवर्ती भागातील ‘मारोतराव शिंदे’ तरणतलावासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी; इतर तरणतलावांची सुविधा असतानाही नागरिकांचा कल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चलनकल्लोळ आणि टंचाईच्या पाश्र्वभूमीवर नागरिक एटीएम आणि बँकांबाहेर पहाटेपासून रांगा लावताना दिसत आहेत. यासाठी लोकांच्या संतापाची तीव्र झळ केंद्र सरकारला सहन करावी लागत आहे. अशा स्थितीत एका रांगेचा मात्र ठाणेकरांना कंटाळा आलेला नाही वा त्यासाठी त्यांनी त्रागाही केलेला नाही. शहरातील मारोतराव िशदे तरणतलावाचे स्वस्त सदस्यत्व मिळविण्यासाठी अनेकांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच स्वखुशीने रांगा लावण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागांत तरणतलावांची सुविधा उभी केली असली तरी बहुतांश तलाव खासगी पद्धतीने चालविण्यास दिले आहेत. गडकरी रंगायतनलगत असलेल्या तरणतलावाचे सदस्य तुलनेने स्वस्त असल्याने या ठिकाणी मोजक्या जागांसाठी शेकडो नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटय़गृहालगत महापालिकेच्या मालकीचा ‘मारोतराव शिंदे’ तरणतलाव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सुविधांनी युक्त अशा या तरणतलावाचे वार्षिक सदस्यत्व मिळावे यासाठी नेहमीच ठाणेकरांमध्ये चढाओढ असते. शहरातील अन्य भागांतील तरणतलाव प्रशासनाने खासगी प्रशासकांना चालविण्यासाठी दिल्यामुळे हे क्लब आणि तलाव महागडे झाले असल्याच्या तक्रारी आहे. तुलनेने मारोतराव िशदे तरणतलावाचे शुल्क मात्र मर्यादित आहे. पोहण्याकडे केवळ हौस, खेळापुरते न पाहता हा एक व्यायाम प्रकार म्हणून प्रचलित होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या मालकीच्या तरणतलावांचे सदस्यत्व मिळावे, यासाठी नागरिकांचे जथे दिसून येतात. खेळाडू, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी मागणी असल्याने शहरातील आणखी काही भागांत तरणतलावांची उभारणी केली जावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
ठाणे शहरात महापालिकेकडून चार तरणतलावांची उभारणी केली आहे. त्यापैकी कोपरी आणि रहेजा परिसरांत उभारण्यात आलेला तलाव खासगी पद्धतीने चालविण्यासाठी देण्यात आला आहे. गडकरी आणि कळवा येथे उभारलेले तरणतलाव महापालिकेमार्फत चालविण्यात येतात. खासगी ठेकेदारांच्या तुलनेत महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या तरणतलावाचे दर कमी आहेत. कळव्यातील तरणतलाव लांब असल्यामुळे ठाण्यातील नागरिक तिकडे जाणे टाळतात. त्यामुळे सगळा भार गडकरी येथील तुलनेने स्वस्त असलेल्या तरणतलावावर पडू लागला आहे. लोकसंख्या व तेथील नागरिकांमधील पोहण्याकडे वळण्याचा कल लक्षात घेता शहरात पाच ते सहा पालिकेने तरणतलाव उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.
काही जागा आरक्षित
या तरणतलावाचे सदस्यपद मिळविण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी यांच्या वशिल्याचे पत्र घेऊन व्यवस्थापनाकडे येणाऱ्यांचा आकडाही बराच मोठा असतो. ज्यांच्याकडे असा वशिला नसतो ते रांगेत उभे राहतात, असे सूत्रांनी सांगितले. व्यवस्थापनाकडून कितीही नकार दिला जात असला तरी राजकीय दबावापोटी काही जागा आरक्षित ठेवाव्याच लागतात, असेही सूत्रांनी सांगितले.
सध्या शिंदे तरणतलाव येथे दोन हजारांहून अधिक सभासद आहेत. त्यापैकी दर महिन्याअखेर काही सभासद बाद होत असतात. बाद झालेल्या सभासदांच्या जागेवर नव्या सभासदांना प्रवेश दिला जातो. मात्र बाद होणाऱ्यांच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने सर्वाना प्रवेश देता येत नाही. या महिन्याला तरणतलावातील १०० जागा भरण्यासाठी तरणतलाव व्यवस्थापनाने नुकतेच अर्ज विक्रीस काढले आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ असे तत्त्व असूनही हे अर्ज मिळविण्यास रांगा लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. – चंद्रकांत शिंगळे, व्यवस्थापक, मारोतराव शिंदे तरणतलाव