ठाणे : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे बेलापूर मार्गावरील विटावा रेल्वे पूल ते कळवा नाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. कळवा येथे महापालिकेने तिसरा खाडी पूल उभारल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे.

सोमवारी या मार्गावरील विटावा रेल्वे पूल ते कळवा नाका पर्यंत उड्डाणपुलाखाली आणि उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे चालकांचे हाल झाले आहे. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धातास लागत आहेत. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचणे शक्य झाले नाही. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य सुरू आहे.

Story img Loader