ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सुमारे २४८ कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्य़ाचा आवाका लक्षात घेता हा निधी पुरेसा नाही. त्यामुळे त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी या बैठका गांभीर्याने घ्याव्या, असा इशाराही या त्यांनी दिला. वालधुनी नदीपात्रात होणारी अतिक्रमणे तातडीने पाडा, असे आदेश पालकमंत्र्यांनी या वेळी दिले.   
ठाणे जिल्ह्य़ातील दिवा, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर अशा प्रमुख शहरांमध्ये पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे या शहरांना अधिक पाणी मिळावे यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले. माळशेज आणि बारवी धरण परिसरात इको टुरिझम आणि गणेशपुरी, माहोली भागात पर्यटन विकासाचे प्रस्ताव येत्या आठ दिवसांत सादर केले जावेत, अशा सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी रेशनच्या धान्याचा तुटवडा जाणवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नदीत घातक रसायने
वालधुनी नदीत सोडण्यात येणाऱ्या घातक रसायनांमुळे झालेल्या वायुगळतीची गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आली. कंपनीतून निघणारे घातक रसायनाचे टँकर या नदीपात्रात रिते केले जात असून यासाठी टँकरचालक आणि कंपनीमालकांची एक मोठी साखळी तयार झाली आहे. तिचा बिमोड करावा लागेल, असे शिंदे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा