शिविगाळ, मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक होईपर्यंत पाठपुरावा
रिक्षाचालकांची मुजोरी आणि उद्दामपणा यांचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याच्या घटना ठाणे शहरात वाढत असताना एका तरुणीने अशाच एका रिक्षाचालकाला कायमची अद्दल घडवली. निश्चितस्थळी न सोडल्यामुळे प्रवासभाडे देण्यास नकार देणाऱ्या या तरुणीला रिक्षाचालकाने अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीने थेट पोलिसांशी संपर्क साधला. एवढेच नव्हे, तर पोलिसांच्या भीतीने पळून गेलेल्या या रिक्षाचालकाला अटक होईपर्यंत तिने समाजमाध्यमातून तसेच प्रत्यक्षपणे पाठपुरावाही केला.
एका नामांकित रेडिओ वाहिनीवर ‘मुंबईची मुलगी’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी रेडिओ जॉकी उर्मिन विजयकर ही ठाण्यात राहते. २८ जून रोजी उर्मिनने पाचपाखाडी येथून ठाणे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. मात्र, रेल्वे स्थानक येण्याआधीच रिक्षाचालकाने तिला उतरण्यास सांगितले. ठरलेल्या ठिकाणी सोडत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत उर्मिनने त्याला ‘स्थानकाजवळ न सोडल्यास पैसे देणार नाही’ असे निक्षून सांगितले. त्यावर रिक्षाचालकाने तिला शिविगाळ केली.
रिक्षाचालकाच्या या असभ्य वर्तनाबाबत उर्मिनने ‘१००’ क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच रिक्षाचालकाने तेथून पळ काढला. परंतु, उर्मिनने त्या रिक्षाचे छायाचित्र मोबाइलद्वारे काढले होते. त्याआधारे तिने पोलिसांत तक्रार केली. तसेच फेसबुकच्या माध्यमातून याप्रकरणी रानही उठवले. अखेर पाच दिवसांनी तो रिक्षाचालक पोलिसांच्या तावडीत सापडला. नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासमक्ष त्याने उर्मिनची माफी मागितली.
अशा लहान-लहान गोष्टींकडे महिला दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा मुजोर रिक्षाचालकांचा धीर चेपतो आणि महिलांना अशा प्रकारांना बळी पडावे लागते. त्यामुळे महिलांनी आपल्यासोबत झालेल्या गैरप्रकाराला वाचा फोडणे अत्यंत गरजेचे आहे.
– उर्मिन विजयकर, रेडिओ जॉकी