डॉ. योगेश करंदीकर यांचे प्रेरणादायी यश; खेडय़ातील घरातून कंपनीची सुरूवात
अथांग विश्वाचा शोध आणि बोध घेण्यासाठी देश-विदेशातील खगोल संशोधकांना मार्गदर्शक ठरलेल्या पुणे जिल्ह्य़ातील नारायणगाव येथील रेडिओ महादुर्बिणीच्या अॅन्टिनांमधील लहरी संग्रहित करणारी अद्ययावत यंत्रणा (रिसिव्हर) विकसित करण्याची कामगिरी अंबरनाथ येथील ‘तंत्रायुत’ कंपनीचे तरुण उद्योजक डॉ. योगेश करंदीकर यांनी नुकतीच पार पाडली.
योगेश यांनी टेलिकम्युनिकेशन विषयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला असताना त्यांनी हौशी खगोल शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी ‘नासा’शी संपर्क साधला. ‘नासा’ने त्यांना परवानगीही दिली. त्या वेळी त्यांनी नारायणगाव येथील रेडिओ महादुर्बीण प्रकल्पातूनच तेथील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरू’ ग्रहाच्या लहरी संग्रहित केल्या. अभियांत्रिकीची पदवी मिळण्याआधीच ‘गुरू’ ग्रहाविषयीचा त्यांचा प्रकल्प पूर्ण झाला होता. त्यानंतर २००५ मध्ये स्वीडन येथील चालमर्स विद्यापीठात ‘रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी आणि स्पेस सायसेन्स’ विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांची निवड झाली. पुढे ‘अॅन्टेना इंजिनीअरिंग’ या विषयात त्यांनी पीएच.डी. केली. २०१४ मध्ये तेथील नोकरीला राम राम ठोकून ते मायदेशी परतले आणि अंबरनाथ येथील जावसई गावातील घरात अॅन्टेनाचे रिसिव्हर विकसित करण्याची कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर भारतातील अवकाश संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणीच्या अॅन्टेनातील लहरी संग्राहक (रिसिव्हर) अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांना मिळाले.
नारायणगाव येथील रेडिओ महादुर्बीण प्रकल्पातील तंत्रज्ञान आधुनिक काळानुसार विकसित करण्याचे काम सुरू झाले होते. त्याचाच एक भाग म्हणून अॅन्टेनावरील लहरी संग्रहित करणारी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. अंतराळातील लहरी पकडण्यासाठी अथवा सोडण्यासाठी अॅन्टेना आवश्यक असतो. तशा प्रकारचे लहरी संग्राहक बनविण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पर्याय उपलब्ध असूनही उद्योजक बनू पाहणाऱ्या डॉ. योगेश करंदीकर या देशातील तरुणाला महादुर्बीण प्रकल्पातील संशोधकांनी संधी दिली. आपल्यावरील हा विश्वास सार्थ ठरवीत डॉ. योगेश यांनी ही कामगिरी चोखपणे पार पाडली आहे. नारायणगाव येथे प्रत्येकी ४५ मीटरचे ३० अॅन्टेना आहेत. त्यातील एका अॅन्टेनाचे लहरी संग्रहित करणारी अद्ययावत यंत्रणा त्यांनी अंबरनाथ येथील घरी परिसरात उपलब्ध असलेल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या आधारे विकसित केली हे विशेष.
आता लक्ष्य ‘स्वेअर किलोमीटर अॅरे’
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या जगातील ‘स्वेअर किलोमीटर अॅरे’ या सर्वात मोठय़ा रेडिओ महादुर्बीण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या महाकाय दुर्बिणीत पाच हजार अॅन्टेना बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी काही अॅन्टेनांचे लहरी संग्रहित करणारी यंत्रणा विकसित करण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. योगेश करंदीकर यांनी सांगितले.