४४ मृतदेह बेवारस, ओळख पटविण्याचे रेल्वेचे आवाहन

75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Chandrapur, two-wheelers children fine,
चंद्रपूर : अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास पालकांनाच होणार दंड
passenger beaten to death on dakshin express
धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून
408 people committed suicide in Dhule district during 2024
धुळे जिल्ह्यात वर्षभरात ४०८ जणांची आत्महत्या; पुरुषांची संख्या सर्वाधिक
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक

वसई-विरार प्रवासात रेल्वे अपघातांमध्ये वाढ होत असून गेल्या सहा महिन्यांत तब्बल विविध अपघातांमध्ये ११३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४४ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृतांचे छायाचित्र असलेले फलक प्रत्येक स्थानकावर लावले आहेत.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशी आठ रेल्वे स्थानक  येतात. वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर शहरातून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१६ ते जून २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत या आठ रेल्वे स्थानकाच्या हद्दीत एकूण ११३ जणांचा मृत्यू झाला तर १५८ जण जखमी झाले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी २० आणि आठवडय़ाला सरासरी ४ ते ५ जणांचा अपघातात मृत्यू होत आहे. सर्वाधिक अपघात हे रूळ ओलांडताना, लोकल ट्रेनचा धक्का लागून, गर्दीमुळे तोल जाऊन खाली पडून होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेवारस मृतदेहांची स्थानकांवर छायाचित्रे

                ११३ मयत प्रवाशांपैकी १५ महिला आणि ९८ पुरुष

प्रवासी आहेत. परंतु त्यातील ४४ मयत प्रवाशांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे या बेवारस मृतदेहांची छायाचित्रे असलेले फलक रेल्वे पोलिसांनी सर्व फलाटांवर लावले आहेत. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला होता. याबाबत बोलताना बागवे यांनी सांगितले की, अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आम्ही विविध मार्गाने प्रयत्न करत असतोच. परंतु फलाटावर जाहीरपणे बेवारस मृतदेहांची छायाचित्रे लावली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. रेल्वेतून विविध भागातील लोक प्रवास करत असतात. ते आपल्या परिचितांना या मृतदेहांमधून ओळखू शकतील. मुंबईत अनेक बेवारस मृतदेहांची अशाच पद्धतीने ओळख पटली होती.

वाढते अपघात ही आमच्यासाठी  चिंतेची बाब आहे. रूळ ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी आम्ही रूळ ओलांडू नये याचे आवाहन प्रवाशांना करून जनजागृती करत असतो. रेल्वेने पुरसे जिने बांधले असून आता स्वयंचलित जिनाही तयार होत आहे. या मार्गावर काही धोकादायक विद्युत खांब आहेत. त्याचा धक्का लागून प्रवाशांचा मृत्यू होत होता. असे धंोकादायक खांब बदलण्यात आले आहेत.

–  महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे</strong>

Story img Loader