लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे दरम्यानचा रेल्वे फाटकाजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन गुरुवारी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे मार्गावरील कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यानचे रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Dombivli railway station work
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद

विठ्ठलवाडी जवळील रेल्वे फाटक बंद करण्यात आल्यामुळे आता कल्याण ते उल्हासनगर आणि पुढे अंबरनाथपर्यंतचा रेल्वे मार्ग फाटक मुक्त झाला आहे. फाटक बंद केल्यामुळे लोकल, लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतूकीत येणारा अडथळा बंद झाला आहे. या बंद फाटकामुळे लोकल वाहतुकीमधील एक ते दोन मिनिटाचा रखडणारा वेळ आता कमी झाला आहे. लोकलची धावसंख्या वाढण्यास साहाय्य होणार आहे, असे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले.

आणखी वाचा-गर्दुल्ल्यांच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास; डोंबिवली, कल्याणचे प्रवासी त्रस्त

कल्याण ते बदलापूर, उल्हासनगर कुर्ला कॅम्प येथे जाण्यासाठी प्रवासी, वाहन चालक या रेल्वे फाटकाचा सर्वाधिक वापर करत होते. मुंबई विभागातील दिव्या नंतरचे सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे फाटक म्हणून विठ्ठलावाडी रेल्वे फाटक ओळखले जात होते. या रेल्वे फाटकातून वर्षाला सुमारे सहा लाख ७३ हजार वाहने धावत होती. दिवा रेल्वे स्थानका जवळील रेल्वे फाटकातून आठ लाख ५३ हजार ३५८ वाहने धावत होती.

रेल्वे फाटकामुळे वाहनांना फाटक प्रवेशव्दारात करावी लागणारी प्रतीक्षा संपून इंधन बचत होणार आहे. या रेल्वे फाटक मार्गावरुन दररोज येजा करणाऱ्या २२४ लोकल, ८० लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस धावत होत्या. रेल्वे फाटकाच्या नियोजनसाठी येथे दररोज तीन रेल्वे कर्मचारी तैनात करावे लागत होते. हे मनुष्यबळ अन्यत्र वापरणे रेल्वेला शक्य होणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-ठाण्याच्या काही भागात आज ५० टक्के पाणी कपात, ऐन पावसाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईचे संकट

उड्डाण पूल

विठ्ठलवाडी रेल्वे फाटका जवळील उड्डाण पुलाचे काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास मंडळातर्फे जून २०२२ मध्ये हाती घेण्यात आले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये ते पूर्ण झाले. ३६ मीटर लांबीच्या या उड्डाण पुलासाठी १७ कोटी खर्च करण्यात आला. पुलाच्या पश्चिम बाजुला १०५ मीटर आणि पूर्व बाजुला ७५ मीटर लांबीचे पोहच रस्ते बांधण्यात आले आहेत. पुलाची रुंदी साडे नऊ मीटर आहे. पदपथ दीड मीटरचे ठेवण्यात आले आहेत.