कल्याण– कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली. या चोरट्याने आतापर्यंत किती प्रवाशांना लुटले आहे याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून वाहनतळाची उभारणी

रोशन नथू पाटील (२९) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो भिवंडीतील दौडा वडवली भागात राहतो. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक कुटुंब प्रवासानिमित्त कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. जिने उतरत असताना रोशनने कुटुंबातील महिलेच्या मंगळसुत्रावर पाळत ठेवली. महिला जिना उतरत असताना पाठीमागून जाऊन तिच्या मानेवर जोराची थाप मारुन गळ्यातील सोनसाखळी हिसकावून रोशन पळून गेला. महिलेसह कुटुंबीयांनी ओरडा करताच गस्तीवरील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. आर. धोत्रे, हवालदार आखले, पाटील, सूर्यवंशी यांनी चोरट्याचा पाठलाग करुन त्याला रेल्वे स्थानक भागातून सोनसाखळीसह अटक केली. लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.