ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे कार्य मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने आठ तासांमध्ये फलाट क्रमांक पाचवर पूर्वी रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले आहेत. या कामांसाठी सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर, अभियंते, कर्मचारी कार्यरत होते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच येथून जलद मार्गिकेच्या रेल्वे गाड्या कल्याण, कसारा, कर्जत दिशेने वाहतूक करत असतात. रात्रीच्या वेळी या फलटावरती प्रवाशांचे मोठी गर्दी असते. अनेकदा फलाटावर चेंगराचगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. पावसाळ्यात प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला होतात. रेल्वे फलाटाची लांबी, उंची अनेकदा वाढल्या आहेत. परंतु रुंदी वाढण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा.

Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
pataal lok release date announced
४ वर्षांनी हाथीराम चौधरी पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पाताल लोक २’ कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
surya gcoahr 2024
२३ दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; मकर राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

आणखी वाचा-ठाणे :रद्द केलेल्या आणि उशिराने धावत असलेल्या लोकल गाडीतील प्रवासामुळे प्रवासी हैराण

मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर तसेच रेल्वेचे कर्मचारी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फलाट क्रमांक चारची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती. त्यानंतर फलाटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रेल्वे रूळ तोडण्यात आले तसेच हे रेल्वे रूळ सुमारे तीन ते साडेतीन मीटर रुंद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. हे कार्य १२ ते १४ तासांमध्ये रेल्वेला अपेक्षित होते परंतु अवघ्या आठ तासात कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हे कार्य पूर्ण केले आहे. दुपारनंतर येथे फलाटाचे मुख्य कार्य देखील हाती घेतले जाणार आहे.

Story img Loader