ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक दोन जवळ रेल्वेच्या २० फूट उंच संरक्षण भिंतीचा भाग कोसळून वृद्ध जखमी झाले. नरेंद्र कोळी (६२) असे जखमीचे नाव असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वीच ही भिंत बांधली होती. जमीन खचल्याने ही भिंतीचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच रुळांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फलाट क्रमांक दोनजवळील कोळीवाडा भागात भिंत उभारली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या भिंतीचा ६० फूट लांब आणि २० फूट उंच भाग कोसळला. याच दरम्यान, नरेंद्र कोळी हे या भागातून जात होते.

हेही वाचा…डोंबिवलीतील नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नागरिकाला २० वर्षाचा कारावास

कोळी या घटनेत जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिका, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी उभारली आहे. जमीन खचल्याने ही भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.