ठाणे : ठाण्यात बुधवारी सांयकाळपासून विजेच्या कडकडाट आणि वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.

हेही वाचा : मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील – जितेंद्र आव्हाड

बुधवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. पावसासोबत वाराही सुरू आहे. अवघ्या २० ते २५ मिनीटाच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी महत्त्वाच्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. वाहतूकीस अडथळा होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सायंकाळी कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले. सुमारे तासाभराने पावसाचा जोर ओसरला आहे.

Story img Loader