ठाणे : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी ठाण्यात येणार आहेत. राज ठाकरे यांची कळवा येथील ९० फूट रोड परिसरात सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेपूर्वी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेणार आहेत. आनंद दिघे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. राज ठाकरे ठाण्यात येत असल्याने मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच दिघे यांचा खरा शिष्य कोण? या वादावर आता राज ठाकरे हे सभेतून पडदा टाकणार असल्याचा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत.

शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून नरेश मस्के तर कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सभा घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. रविवारी सायंकाळी कळवा येथील ९० फूट रोड परिसरात राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची तयारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे.

raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray speech
‘तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’, उद्धव ठाकरेंचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भावनिक आवाहन
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!

हेही वाचा : कल्याणमध्ये बाळ हरदास यांची शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी, बाळ हरदास यांनी आरोप फेटाळले

सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे हे टेंभी नाका येथील आनंदाश्रमाला भेट देणार आहेत. आनंद दिघे हे या आनंद आश्रमात राहत होते. येथून पूर्ण ठाणे जिल्ह्याचा कारभार हाकत होते. या आनंद आश्रमात ते जनता दरबार भरवत असे. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवीत होते. राज ठाकरे आता या आनंदाश्रमाला भेट देणार असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी ४.३० वाजता राज ठाकरे आनंद आश्रमाला भेट देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच महायुतीचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते देखिल यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.

हेही वाचा : कळवा, मुंब्रा, दिव्यात पुन्हा बेकायदा बांधकामे, उबाठाने समाजमाध्यमांवर प्रसारित केली बांधकामांची छायाचित्रे

शिवसेनेत भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे हे अध्यक्ष असताना नरेश म्हस्के यांच्यावर विद्यार्थी सेनेची ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती. राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले धडाडीचे कार्यकर्ते म्हणून नरेश म्हस्के यांची ओळख आहे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्यावर नरेश म्हस्के यांनी राजगड येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. तेव्हा ठाणे लोकसभा क्षेत्रातील मनसैनिक नरेश म्हस्के यांच्या पाठिशी खंबीर उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती. रविवारी राज ठाकरे काय बोलणार? यावर सगळ्यांचे आता लक्ष आहे.