राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ ठाण्यामध्ये शनिवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या काही तास आधीच ही सभा होणार असून त्यामुळे शेवटच्या प्रचार सभेत राज हे काय बोलणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आज, शनिवार सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून यामुळे उमेदवारांकडे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ठाण्यात जाहीर सभा घेतली. त्याआधी कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत पक्ष अध्यक्ष शरद पवार हे स्वत: सहभागी झाले होते. या बडय़ा नेत्यांनी शहरात लावलेल्या उपस्थितीमुळे प्रचाराची रंगत वाढली आहे.

असे असतानाच आज, शनिवार दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मनसेतर्फे ठाणे शहरमधून अविनाश जाधव, कोपरी-पाचपखाडीमधून महेश कदम आणि ओवळा-माजिवाडामधून संदीप पाचंगे हे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या तिघांच्या प्रचारासाठी राज यांची ही सभा होणार आहे.

रस्त्यावरच जाहीर सभा..

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जाहीर सभा घेण्यासाठी मैदाने शिल्लक नाहीत. न्यायालयाच्या आदेशामुळे सेंट्रल मैदान, तर शांतता क्षेत्रामुळे गावदेवी मैदानात जाहीर सभा घेण्यास बंदी आहे. सभेसाठी मैदाने मिळत नसल्याने रस्त्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या रस्त्यावरच जाहीर सभा झाल्या. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री फडणवीस यांची ज्या ठिकाणी जाहीर सभा झाली, त्याच ठिकाणी म्हणजेच ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर राज यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी नौपाडय़ातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठाण्यातील भाडेतत्त्वावरील घरांमध्ये राहणारे नागरिकांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांची भेट घेणार आहे.