ठाणे : आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. एकामध्ये दु:खाश्रू आहेत. गेल्या ३८ वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेनेचे काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि २००९ ते २०१९ मध्ये आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेना उपनेता झालो. सर्वसामयान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहचलो तो पक्ष आज मला मागे सोडून नव्या प्रवाहात यावे लागत आहे, याबाबत मला दु:ख आहे असे माजी आमदार राजन साळवी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यावेळी राजन साळवी माध्यमांसमोर बोलत होते. साळवी म्हणाले की, ९ फेब्रुवारीला भाईंना (एकनाथ शिंदे) भेटून कुटुंबातील सदस्य येऊ इच्छित असल्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना प्रमुखांच्या आशिर्वादाने २००० साली जिल्हाप्रमुख झालो. त्यावेळी याच ठिकाणी माझा दिवंगत आनंद दिघे यांनी सत्कार झाला होता. आज, अनेक वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझा सन्मान होत आहे. आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. एकामध्ये दु:खाश्रू आहेत. गेल्या ३८ वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेनेचे काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि २००९ ते २०१९ मध्ये आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेना उपनेता झालो. सर्वसामयान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहचलो तो पक्ष आज मला मागे टाकून सोडून नव्या प्रवाहात यावे लागत आहे, याबाबत मला दु:ख आहे असे माजी आमदार राजन साळवी म्हणाले. तर, दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. कुटुंबातील सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रेम केले आहे असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.  मला शिवसेना पक्षाकडून सर्वकाही मिळाले आहे. मी समाधानी आहे. पंरतु भविष्यात काळखंडात संघटना वाढविणे मोठे होईल. माझ्या सोबत आलेल्या शिवसैनिकांना योग्य सन्मान दिला जावा अशी अपेक्षा असल्याचेही साळवी म्हणाले.

विनायक राऊत यांच्यावर आरोप

अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकलो नव्हतो. त्याचे मला दु:ख आहे. २०२४ च्या निवडणूकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ झाली युतीची सत्ता आली. त्यावेळी मंत्री होईल असे वाटले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझी शिफारस केली होती. परंतु मी मंत्री होऊ शकलो नाही. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यावेळी दिपक केसरकर यांना मंत्री केले. २०१९ च्या निवडणूकीत मी पुन्हा मंत्री होईल असे वाटले होते. त्यावेळी उदय सामंत मंत्री झाले. २०२४ च्या निवडणूकीत सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार असे वाटले होते. पण नियतीच्या मनात वेगळे होते. २०२४ पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. सिंधूदूर्ग जिल्ह्यात विनायक राऊत यांना आम्ही खासदार केले. त्याच विनायक राऊत यांनी किरण सामंत यांचे काम केले असा आरोप देखील त्यांनी राऊत यांच्यावर केला.