ठाणे : राज्यात शिवसैनिकांना त्रास देण्याचे, त्यांच्या घरादारावर नांगर फिरविण्याचे आणि त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे, सच्चे शिवसैनिक म्हणवून घेतात, ते सच्चे शिवसैनिक असूच शकत नाही. जनता आणि आनंद दिघे हेच गद्दारांना त्यांची जागा दाखवतील, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची जयंती शनिवारी शहरात सर्वत्र साजरी करण्यात आली. दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी खारकर आळी येथील शक्तीस्थळ येथे जाऊन दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच टेंभी नाका येथील दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी ‘आनंद दिघे अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. यानिमित्ताने ठाकरे गटाने टेंभी नाका आणि शक्तीस्थळावर शक्ती प्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचा…आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शक्तीस्थळावर येण्याच्या अर्धा तास आधीच ठाकरे गट येथे येऊन गेल्याने दोन्ही गटातील संघर्ष टळला. दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार विचारे यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे गटावर टीका केली. आज आनंद दिघे यांच्या फोटोकडे पाहिले तर, त्यांच्या डोळ्यात अश्रु येताना दिसतात. गद्दारांना क्षमा नाही, अशी त्यांची शिकवण होती. पण, आज राज्यात शिवसैनिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या घरादारावर नांगर फिरविण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याच काम चालू आहे. त्यामुळे जे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे, सच्चे शिवसैनिक म्हणवून घेतात, ते सच्चे शिवसैनिक असूच शकत नाही, अशी टिका विचारे यांनी केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेऊन ही मंडळी काम करीत आहेत. परंतु हे दुर्दैव आहे. जनता आणि धर्मवीर आनंद दिघे हेच गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajan vichare slams eknath shinde on the occasion of birth anniversary of anand dighe psg