*राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, तांत्रिक व रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात यावे यासाठी ही योजना राबविण्यात येते.
*या योजनेअंतर्गत व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम (जास्तीतजास्त ५ वष्रे) करिता जास्तीतजास्त पाच लाखांपर्यंत तीन टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते.
*राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत प्रतिवर्ष ५०००० रुपये याप्रमाणे पाच वष्रे कालावधीकरिता अडीच लाख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत पाच वर्षांसाठी ५०,००० प्रतिवर्ष याप्रमाणे कर्ज उपलब्ध करण्यात येते.
*कर्ज मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महामंडळाने विहित केलेले वैधानिक दस्तावेज व त्रुटींची पूर्तता केल्यानंतर कर्ज मंजुरीचे खातेदेय असलेले धनादेश देण्यात येतील.
*शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून जास्तीतजास्त पाच वर्षांचा राहील.
*अर्जदाराची वयोमर्यादा १६ ते ३२ दरम्यान असावी आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी ५४,५०० रुपये, तर ग्रामीण भागासाठी ३९,५०० असे असावे.
राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, तांत्रिक व रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात यावे यासाठी ही योजना राबविण्यात येते.
आणखी वाचा
First published on: 14-05-2015 at 12:46 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv gandhi loan scholarship scheme