भाईंदर : पक्षातील दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे महाराष्ट्रातील खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असून तिला घड्याळाचे  निवडणूक दिले जाईल,असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. येत्या ९ जुलै रोजी दलित पॅंथर संघटनेला पन्नास वर्षे पूर्ण होणार आहे.यानिमित्ताने शहरातील ‘भारतरत्न गान सम्राज्ञी  लता मंगेशकर’ नाट्य गृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे याबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले मीरा-भाईंदर मध्ये आले होते.यावेळी पत्रकारांशी सवांद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजित पावरांचे स्वागत आहे.ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांचे पाठबळ सरकारला दिले आहे. त्याच प्रमाणे अजित पवारांनी देखील चाळीस आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे.अजित पवारांना पक्षातील दोन तृतीयांश म्हणजे ३६ आमदारांच्या पाठिंबाची गरज आहे.त्यामुळे त्यांच्याकडे हे संख्याबळ असेल याची अपेक्षा आहे.म्हणून आता महाराष्ट्रातील  खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच हे स्पष्ट झाले आहे.त्यानुसार तिला घड्याळ हे निवडणूक चिन्ह दिले जाईल.मात्र अजित पवारांनी आपल्याजवळ असलेले आमदार कुठेही फिरकणार नाही याची  काळजी घ्यावी ” असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे.