शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा पुतळा जाळला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे – रामदास कदम यांनी ज्या भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे ती अत्यंत चुकीची आणि अस्वीकाहार्य आहे. रामदास कदम हे बेईमान आहेत. त्यांनी हे दाखवून दिले आहे. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्त ठाण्यातील तलावपाली परिसरात  शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यावेळी विचारे यांनी ही टीका केली. तसेच यावेळी शिवसैनिकांकडून रामदास कदम यांचा पुतळाही जाळण्यात आला.

हेही वाचा >>> आमदार कथोरे मुरबाडमध्ये चकाचक रस्ते बांधू शकतात, रवींद्र चव्हाणांना ते का जमले नाही ; शिवसेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांची टीका

हेही वाचा >>> ठाणे : जिल्ह्यात तीन आठवड्यात १६ करोना मृत्यू; रुग्णसंख्या घटली मृत्यू वाढले

शिवसेनेतून  शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी यांच्या राजकीय व्यासपीठावर का दिसतात असा सवाल उपस्थित करत रश्मी ठाकरे यांना देखील लक्ष्य केले होते. रामदास कदम यांच्या टीकेनंतर  शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यांचा राज्यभरातील शिवसैनिकांडून निषेध केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात देखील शिवसैनिकांडून रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला. ठाण्यातील तलावपाली परिसरात शिवसैनिकांकडून रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी रामदास कदम यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार राजन विचारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांच्यावर टीका केली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका अत्यंत चुकीची आणि अस्वीकाहार्य आहे. रामदास कदम हे बेईमान असून  त्यांनी हे दाखवून दिले आहे. अशा शब्दात विचारे यांनी टीका केली आहे. तसेच केदार दिघे यांनी देखील यावेळी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे मत व्यक्त केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam criticism mp rajan vichare shiv sainiks shiv sena ysh