उल्हासनगरमधील एक बोगस पत्रकार उल्हास महिंद्रकर ऊर्फ पप्पू याच्याविरोधात एका विकासकाकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही पप्पूविरोधात एका कारखानदाराकडे एक लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  
उल्हासनगर कॅम्प पाचमधील गायकवाड पाडा येथे ज्ञानेश्वर करवंदे यांच्या नातेवाईकाचे घर दुरुस्तीचे काम सुरू आहे. पप्पू हा पत्रकार असल्याचे सांगून बेकायदा बांधकामाविरोधात  तक्रार करीन असे सांगून विकासकाकडे खंडणीची मागणी करीत होता. करवंदे यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. शिवाजीनगर पोलिसांनी पप्पूविरोधात गुन्हा दाखल केला. मार्चमध्येही पप्पूविरोधात कारखानदार विवेक राय यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. भूमाफिया, विकासकांना हे बोगस पत्रकार सध्या लक्ष्य करीत आहेत.

Story img Loader