लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पुण्यातील एका तरुणीने तिच्यावर संतोष सोनवणे (३०) या पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सोनवणे याने बीएस्सीच्या पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगत तसेच लग्नाचे आश्वासन देत आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. पीडित तरुणी पुण्यातील हडपसर भागात राहणारी असून राहत्या घरीच सोनवणे याने अत्याचार केल्याचा तिचा आरोप आहे. १३ ते २६ एप्रिलदरम्यान हा प्रकार घडला आहे, अशी तक्रार पीडित तरुणीने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा