कल्याणमध्ये दुर्मिळ ‘ चित्रांग नायकूळ’ जातीचा साप आढळला आहे. या सापाला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. हा साप एका दुकानात शिरला होता. यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. कल्याण पूर्वतील चिंचपाडा परिसरात असणाऱ्या एका दुकानात शिरला होता. वॉर फाऊंडेशनच्या सदस्यांनी या सापाला पकडलं आणि वनविभागाच्या ताब्यात दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचपाडा परिसरात एका दुकानात साप शिरल्याने दुकान मालकासह कामगार घाबरले. या अनोळखी सापाला पकडायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दुकानात साप शिरला असल्याची माहिती प्राणी संगोपनासाठी काम करणाऱ्या वॉर फाऊंडेशनच्या हेल्पलाइनवर देण्यात आली. या माहितीच्या आधारे वॉर फाऊंडेशनचे सदस्य पियुष पालव यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ‘ चित्रांग नायकूळ ‘ या दुर्मिळ जातीच्या सापाला कौशल्याने पकडले. या सापा विषयीची माहिती पियुषने उपस्थित नागरीकांना दिली. त्यानंतर हा दुर्मिळ साप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.

वाढत्या तापमानामुळे बिळात असलेले हे साप मोठ्या प्रमाणात गारव्यासाठी व भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतात, असे पालवे यांनी सांगितले. कल्याण शहरात पहिल्यांदाच हा साप आढळून आला असल्याचे वॉर संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगितले. यापूर्वी २०२० मध्ये कळवा येथे असा साप सापडला होता, असे कांबळे यांनी सांगितले.

आपल्या घर परिसरात कुठेही सरपटणारे प्राणी आढळून आल्यास त्यांना मारू नका. याची माहिती तात्काळ वॉर फाउंडेशन किंवा साप पकडणाऱ्या व्यक्तीना द्या, असे आवाहन प्राणीमित्र संघटनेने केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare snake found in kalyan sgy