शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्याच्या टेंभी नाक्यावर सुरु केलेल्या बहुचर्चित नवरात्री उत्सवास रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी दिलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे समर्थकांनी केलेले शक्ती प्रदर्शन, त्यानंतर घेण्यात आलेली महाआरती आणि स्वर्गीय दिघे यांचे वास्तव्य असलेल्या आनंद आश्रमात दिलेली भेटी दरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. या उत्सवाचे आयोजक असलेल्या मंडळामार्फत ठाकरे कुटुंबियांना कोणतेही निमंत्रण नव्हते अशी चर्चा आहे. असे असताना रश्मी यांच्यासोबत टेंभी नाका येथे आलेल्या मुंबई, नवी मुंबईतील महिला कार्यकर्त्यानी देवीच्या मंडपात केलेली राजकीय घोषणाबाजी आणि महाआरतीसाठी निश्चित असलेल्या वेळांचे केलेले उल्लंघनाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी उचलून धरला आहे. ठाण्यातील या उत्सवास एरवी भेट देताना आनंद मठाकडे ढुंकूनही न पहाणाऱ्या ठाकरे कुटुंबियांना आता बरे शक्तीस्थळ आठवू लागले आहे, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा