ठाणे – नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीत गांजा, चरस ही अमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ठाणे : वीजेचा धक्का लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

घोडबंदर येथील कासारवडवली भागात रेव्ह पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्री युनिट पाचचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पार्टी सुरू झाल्यानंतर पथकाने येथे धाड टाकली. त्यांनी सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारवडवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.

हेही वाचा – ठाणे रेल्वे स्थानकात ठाकरे गट आणि भाजपचे शक्तीप्रदर्शन

या प्रकरणात पोलिसांनी ८,०३,५६० किंमतीचा ७० ग्रॅम चरस, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर/वाईन/व्हिस्की, असा अंमली पदार्थ, मद्य साठा, डीजे मशिन, २९ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्याबाबत एनडीपीएस अ‍ॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rave party in thane 100 people detained ssb