Ramdas Kadam : मुंबई गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरे कशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. या टीकेमुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे खेड-दापोली-मंडणगड येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत, मुंबई गोवा मार्गाच्या कामाविषयी संताप व्यक्त केला. १४ वर्षांनंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला होता. परंतु मुंबई गोवा मार्गाचा आमचा वनवास संपत नाही. याचे दु:ख आणि वेदना माझ्या मनामध्ये आहे. मुंबई-गोवा मार्गाच्या कामाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी डिसेंबरमध्ये जाहीर केले होते की, पुढील गणपतीमध्ये मुंबई गोवा रस्ता पूर्ण होईल. परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. आमचे गणपती पेणमधून कोकणात व्यवस्थित जाऊ शकत नाही. आम्ही काय पाप केले आहे असे कदम म्हणाले.

हेही वाचा – कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला अटक

हेही वाचा – Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला

मुंबई गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरे कशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. हे अत्यंत कुचकामी मंत्री आहेत. युती असतानाही मी हे जाहीरपणे बोलत आहे. कारण कोकणातील लोक आम्हाला जाब विचारत आहेत, अशी टीका कदम यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra chavan is an ineffective minister devendra fadnavis should take his resignation criticism of ramdas kadam ssb