लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उल्हासनगरः कल्याण बदलापूर राज्यमार्गावर सतरा सेक्शन चौकातून फॉरवर लाईन चौकाकडे जाताना चालत्या दुचाकीवर रिल्स तयार करणे तरूण आणि तरूणीला महागात पडले आहे. हा तरूण दुचाकी चालवत असताना मागे बसलेली तरूणी स्वतःवर आणि तरूणावर सतत पाणी टाकत होती. ही चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर बेदरकारण आणि हयगयीने दुचाकी चालवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसात उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य हैराण झाले असून उष्णता टाळण्यासाठी विविध उपाय करत आहेत. नेहमीप्रमाणे या उष्णतेच्या झळीची दखल समाजमाध्यमांनी घेतली नसती तर नवलच. समाज माध्यमांवरही वाढत्या तापमानावर अनेक संदेश, मीम्स आणि रिल्स प्रसारीत होत आहेत. अशाच प्रकारे उन्हाची काहिली दाखवणारी रिल्स उल्हासनगरातील एका तरूणाने तयार केली. चुभती, जलती गर्मी का मौसम आया… या एका जाहिरातीच्या गाण्यावर या तरूणाने रिल्स तयार केला. यामध्ये कल्याण बदलापूर या वर्दळीच्या राज्यमार्गावर आदर्श शुक्ला नावाचा तरूण दुचाकीने प्रवास करताना त्यामागे दुचाकीवर बसलेली तरूणी दोघांवर पाणी टाकते.

आणखी वाचा- निराधार योजनेत लाचखोरी, सेतू संचालकासह सहसंचालकाला अटक

उन्हाच्या झळा बसू नये म्हणून दुचाकीवरही पाण्याने आंघोळ करण्याची आता वेळ आली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या तरूणाने दुचाकीवर केला. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झाली. मात्र ही रिल्स तयार करणे या तरूण आणि तरूणीला महागात पडले आहे. सार्वजनिक रस्त्यावर स्वतःला किंवा तर व्यक्तीला दुखापत होईल याची माहिती असतानाही दुचाकी चालवताना हेम्लेट परिधान न करता एका हाताने बेदरकारपणे आणि हयगयीने दुचाकी चालवली म्हणून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आदर्श शुक्ला आणि त्याच्यासोबतची तरूणी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.