सध्याच्या अत्यंत धावपळीच्या जीवनात ‘हेल्थ इज वेल्थ’चे महत्त्व नव्याने पटल्यानंतर तर व्यायामाचा कंटाळा असणारी अथवा शारीरिक कसरतींना नाके मुरडणारी मंडळीही सकाळ-संध्याकाळी सोयीच्या वेळेत नियमितपणे थोडेफार हातपाय हलवू लागली आहे. या बदलत्या दृष्टिकोनामुळे पूर्वी शाळेच्या बंदिस्त वास्तूत सुरू असणाऱ्या व्यायामाच्या कसरती आता उद्याने, जॉगिंग ट्रॅक अथवा थेट नाना-नानी पार्कमध्ये जाऊन पोहोचल्या आहेत.
नव्वदच्या दशकात हृदयरोग, मधुमेह अथवा रक्तदाब या आजारांचे प्रमाण वाढू लागले. सदोष जीवनपद्धतीमुळे हे आजार बळावत असल्याने डॉक्टर्स रुग्णांना औषधोपचारांबरोबरच नियमित व्यायाम अथवा किमान चालण्याचा सल्ला देऊ लागले. त्यामुळे सकाळी ट्रॅक सूट घालून वर्षांचे बाराही महिने चालणाऱ्यांचे प्रमाण वाढले. सुटलेली पोटे कमी करण्यासाठी अनेक मध्यमवयीन स्त्री-पुरुष धाप लागून अंगातून घाम येईपर्यंत धावू लागली. निवृत्तीनंतर निवांत असणारे अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळीच व्यायामाच्या निमित्ताने घराबाहेर पडून कट्टय़ावर रेंगाळू लागले. संध्याछायेचे भय कमी व्हावे म्हणून समवयस्कांमध्ये रमू लागले आहेत.

कबड्डी ते शरीरसौष्ठव
सत्तरच्या दशकांपासून ठाणे परिसरात बहुतेक व्यायमशाळांचे कबड्डीचे संघ होते. तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये विशिष्ट व्यायामशाळेच्या नावाने ओळखली जाणारी क्रीडामंडळे भाग घेत होती. व्यायामशाळेत मेहनत करून कमाविलेल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन घडविण्याचे कबड्डी हे एक महत्त्वाचे माध्यम होते. मात्र, आता त्याची जागा शरीर सौष्ठव स्पर्धानी घेतली आहे.   

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत

नव्या संकुलांचे संस्कार
नव्या गृहनिर्माण सोसायटय़ांनी इतर अनेक सुखसोयींप्रमाणेच आवारात अद्ययावत व्यायामशाळा उभारून दिल्या आहेत. काहींनी तर खास प्रशिक्षकांची नेमणूकही केली आहे. पूर्वीच्या चाळ संस्कृतीत अशी कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे सर्रास सर्वानी व्यायामशाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. आता बहुतेक नव्या सोसायटीत जिम असते. त्यामुळे या नवीन गृहनिर्माण सोसायटी संस्कृतीने व्यायामाच्या संस्कारांचा मोठय़ा प्रमाणात प्रसार केल्याचे दिसून येते.

योगाची जोड

गेल्या काही वर्षांत विशेषत: जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जीवनशैली कमालीची बदलल्यामुळे नागरिकांचे आयुष्य बरेच धावपळीचे झाले आहे. अनिश्चितता आणि असुरक्षितेमुळे ताणतणाव वाढू लागले आहेत. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. या तणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी नियमित योगोपचार उपयोगी पडू लागले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी सकाळ-संध्याकाळी योग प्रशिक्षण वर्गात गर्दी होत आहे.

उपवास ते डाएट   
उपवासाप्रमाणेच ‘डाएट’ असल्याचे सांगून समोर आलेला पदार्थ आता अनेक जण नाकारू लागले आहेत. तसेच खाण्यापूर्वी त्या पदार्थातील कॅलरीज्बद्दल कुतूहलाने चौकशी केली जाऊ लागली आहे. त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला जाऊ लागला आहे. सुदृढ म्हणजे गुटगुटीत हे समीकरण मागे पडून सडपातळ, शिडशिडीत म्हणजे धडधाकट हे निरोगी आयुष्याचे नवे सूत्र बनले आहे.
प्रशांत मोरे 

जुन्या व्यायामशाळा आजही यशस्वी
* श्री आनंदभारती व्यायामशाळा, चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पू.)
स्थापना : १९२८
१९१० मध्ये स्थापन झालेल्या श्री आनंदभारती समाज, ठाणे या संस्थेचे आद्य संस्थापक कै. राजाराम चंद्राजी नाखवा आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू कै. वामन चंद्राजी नाखवा यांनी दान केलेल्या भूखंडावर श्री आनंदभारती व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे. पूर्वी कुस्तीसाठी मातीचा आखाडा, जोर, बैठका, सूर्यनमस्कार, मुद्गल आदी माध्यमांतून व्यायामाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जात होते. मात्र सध्या विविध अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेल्या व्यायामशाळेत पॉवरलिफ्िंटगचे १२ बेंच उपलब्ध आहेत.  
* उमा निळकंठ व्यायामशाळा, नौपाडा, ठाणे (प.)
स्थापना : १९३३
ठाण्यातील ब्राह्मण सोसायटीत असणाऱ्या हितवर्धिनी सभेअंर्तगत उमा निळकंठ व्यायामशाळेचे कामकाज चालते. उमा निळकंठ व्यायामशाळेत बी केबीन, ज्ञानसाधना महाविद्यालय, आनंदनगर परिसरातून येणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.  मासिक ४५० रुपये, तिमाही १०५० रुपये, वार्षिक ३ हजार ३०० रुपये तसेच धावण्याचे यंत्र (ट्रेडमिल) वापरणाऱ्यांसाठी अतिरिक्त २५० रुपये असे शुल्क आकारण्यात येते.  
* दि युनायटेड स्पोर्टस् कल्ब, चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पू.)
स्थापना : १९४०
ठाणे पूर्वेकडील चेंदणी कोळीवाडा भागात शिशु विकास मंदिर शाळेच्या पटांगणात असलेल्या ‘दि युनायटेड स्पोर्टस् क्लब’ व्यायामशाळाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. व्यायामशाळेचे प्रवेश शुल्क २०० रुपये असून मासिक शुल्क १०० रुपये आहे. या व्यायामशाळेत एकूण १५० व्यायामपटू आहेत. व्यायामशाळेचे प्रशिक्षक म्हणून शशिकांत रमेश कोळी काम पाहतात.  
* मावळी मंडळ व्यायामशाळा, चरई, ठाणे (प.)
स्थापना : १९४८
मावळी मंडळ संस्थेची स्थापना १९२५ मध्ये करण्यात आली असून व्यायामशाळेची मुहूर्तमेढ १९४८ साली  रोवण्यात आली. ठाणे शहरातील नावाजलेली व्यायामशाळा असा लौकिक असलेल्या या व्यायामशाळेत सुमारे एक हजार पुरुष आणि २०० महिला व्यायाम करतात. पुरुषांसाठी मासिक ३०० रुपये आणि महिलांसाठी ३५० रुपये शुल्क आकरण्यात येते.   
* जयभारत व्यायामशाळा, कळवा, ठाणे.
स्थापना : १९६५
खारेगाव येथे असणाऱ्या जयभारत व्यायामशाळेत ३२५हून अधिक सदस्य आहेत. दुमजली इमारत, पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय, स्वच्छतागृह, संगीत ऐकत व्यायाम करण्याची सोय जयभारत व्यायामशाळेत व्यायामपटूंना आहे.  
* नमस्कार मंडळ, कल्याण</strong>
स्थापना- १९२४
कल्याणमधील सर्वात जुनी आणि ‘सूर्यनमस्कारांसाठी वाहून घेतलेली’ व्यायामशाळा म्हणजे नमस्कार मंडळ कल्याण. १९२४ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर गांधी चौकातील सुभेदार वाडा येथील मोकळ्या जागेत या व्यायामशाळेची स्थापना झाली. १९४० मध्ये सध्याच्या वास्तूत म्हणजेच आग्रा रोड जवळील नमस्कार मंडळ येथे ही व्यायामशाळा हलविण्यात आली. एक मजल्याच्या या इमारतीत तळमजल्यावर व्यायामशाळा व पहिल्या मजल्यावर बैठका, नमस्कार आदी उपक्रम चालतात.
 (संकलन : विनित जांगळे,     समीर पाटणकर)