ठाणे : वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या दोन उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे येत्या दोन दिवसांत हाती घेतली जाणार आहेत. ही कामे रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्याने ही कामे केली जाणार आहेत. ऐन पावसाळ्यात ही कामे हाती घेण्यात आल्याने घोडबंदर मार्गावर कोंडी होण्याची भिती व्यक्त होत आहे. रस्ते दुरुस्तीची कामे प्रशासनाला उन्हाळ्यात का सूचली नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. कासारवडवलीपर्यंत सिमीत असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत. घोडबंदर मार्गावर उरण येथील जेएनपीटीच्या बंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ असे तीन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. असे असले तरी मेट्रोची कामे, रस्त्यांची बिकट अवस्था, सेवा रस्त्यांचे खोदकाम यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी वाढली असून नागरिक हवालदील झाले आहेत. तसेच येथे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
navi Mumbai potholes repairing works
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य

हेही वाचा – दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याची निर्दोष सुटका

काही दिवसांपूर्वीच येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. या कामांमुळे कासारवडवलीपर्यंत वाहतूक कोंडी होत होती. तर, बोरीवली, मिरा भाईंदर आणि वसईच्या दिशेने प्रवास करणारे वाहन चालक हैराण झाले होते. अवघ्या २० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना दोन ते अडीच तास लागत होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील मानपाडा आणि पातलीपाडा या उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. यातील पातलीपाडा या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पातलीपाडा मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असून याबाबत वाहतूक पोलिसांनी त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. पातलीपाडा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी

येत्या एक ते दोन दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु ही कामे रात्रीच्या वेळेत सुरू ठेवावी अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू राहील. – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.