पालघर नगर परिषद निवडणुकीचे पडघम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या विविध प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवरांची लगबग सुरू झाली आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना १४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
पालघर शहराची लोकसंख्या ६८ हजार ९३० असून त्यानुसार १४ प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात ४,४३२ ते ५,४१६ लोकसंख्या असेल, अशा प्रकारे विभागणी करण्यात आली आहे. पालघरचे उपविभागाीय अधिकारी विकास गजरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी १४ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पालघरचे तहसीलदार महेश सागर, पालघरचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे या बैठकीला उपस्थित होते.
लोकसंख्येवर आधारित अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे आरक्षण करण्यात आले आहे. अनुसूचित जातींसाठी एक तर अनुसूचित जमातींसाठी चार प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ प्रभाग आरक्षित असून सर्वसाधारण महिलांसाठी सात प्रभागांवर आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली.
पालघरचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असून प्रभाग रचना व त्याचे आरक्षण १४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्याबाबत २१ डिसेंबपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली असली तरी नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या नकाशा व गुगल मॅप आधारे प्रभागातील रचना स्पष्ट झाली आहे.
प्रभाग रचनेत मोठे बदल
१ अ : अनुसूचित जमाती
१ ब : सर्वसाधारण (महिला)
२ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२ ब : सर्वसाधारण
३ अ : अनुसूचित जमाती(महिला)
३ ब : सर्वसाधारण
४ अ: अनुसूचित जमाती (महिला)
४ ब : सर्वसाधारण
५ अ : अनुसूचित जमाती
५ ब : सर्वसाधारण (महिला)
६ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
६ ब : सर्वसाधारण (महिला)
७ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
७ ब : सर्वसाधारण (महिला)
८ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
८ ब : सर्वसाधारण (महिला)
९ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
९ ब : सर्वसाधारण
१० अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१० ब : सर्वसाधारण
११अ : अनुसूचित जाती (महिला)
११ ब : सर्वसाधारण
१२ अ : सर्वसाधारण (महिला)
१२ ब : सर्वसाधारण
१३ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१३ ब : सर्वसाधारण
१४ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
१४ ब : सर्वसाधारण (महिला)