अबू धाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर (एडीएनईसी) येथे नुकत्याच झालेल्या विशेष मुलांच्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये टेबल टेनिस खेळात ठाण्यातील रेश्मा शेख हिने रौप्यपदक पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील होली क्रॉस या विशेष मुलांच्या शाळेत रेश्मा शेख शिकत आहे. क्रीडा क्षेत्रातील रेश्माची आवड लक्षात घेऊन होली क्रॉसच्या मुख्याध्यापिका सिस्टर अ‍ॅन्सी यांनी तिच्यासाठी श्रीरंग शाळेत सुरू असणाऱ्या पिनॅकल टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. समीर सारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्मा टेबल टेनिसचे प्रशिक्षण घेऊ लागली.

राबोडी येथील आर्थिकदृष्टय़ा गरीब कुटुंबात वाढलेल्या रेश्माचा खेळाप्रति उत्साह आणि मेहनत करण्याची तयारी पाहून प्रशिक्षकांनी तिला कोणतेही शुल्क न घेता शिकविण्याचे ठरविले. गेली ४ वर्षे तिच्याकडून सातत्याने टेबल टेनिसचा सराव करून घेतला गेला. खेळासह तिच्या व्यक्तिमत्त्वात देखील विकास घडत गेला. प्रवेशाच्या वेळी ती तिचे विचार ठामपणे मांडू शकत नव्हती. असे असतानाही खेळाच्या मदतीने तिने स्वत:मध्ये बदल घडवत विशेष ऑलिम्पिकसारख्या प्रख्यात स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहे, असे तिच्या प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले. रेश्मा तिच्या भावी आयुष्यात स्वबळावर उभी राहील आणि हेच तिचे मुख्य ध्येय असावे असा विश्वास प्रशिक्षक समीर सारळकर, प्रदीप मोकाशी यांनी व्यक्त केला.