कल्याण : डोंबिवलीतील कोपर भागात सिध्दार्थनगर झोपडपट्टीमध्ये मांगीलाल मोरे या रहिवाशाचा मृत्यू कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथदिव्यांच्या जिवंत वीज वाहिनीचा धक्का बसून झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली. सिध्दार्थनगरमध्ये मांगिलाल मोरे या रहिवाशाचा मृत्यू महावितरणच्या वीज वाहिनीमुळे झाल्याचा आरोप करत या भागातील रहिवाशांनी बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले होते.

या आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सिध्दार्थनगर येथील महावितरणचे विजेचे खांब, या खांबांवरील जिवंत वीज वाहिन्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांना पालिकेच्या पथदिव्याची जिवंत वीज वाहिनी मोरे राहत असलेल्या इमारतीच्या लोखंडी जिन्याला स्पर्श करत असल्याचे जाणवले. या वाहिनीतून प्रवाह लोखंडी जिन्यात प्रवाहीत झाला. त्याचा धक्का लागून मोरे यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष महावितरण अधिकाऱ्यांनी काढला.

western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
stampede at Sangam ghat on Mauni Amavasya in Prayagraj on Wednesday Maha kumbh Yogi Adityanath
Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तीस भाविकांचा मृत्यू
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
pune pmp bus driver accident news
पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू, वानवडीतील घटना; चालक ताब्यात
Nepal citizens died , Jalgaon train accident, Jalgaon ,
जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> ठाणे : मयुर शिंदे याच्या अटकेनंतर ठाण्यातील राजकारण तापले

मांगिलाल मोरे यांचा सिध्दार्थनगर मधील घराच्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या चढत असताना मंगळवारी रात्रीच्या वेळेत विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. महावितरणच्या वीज खांबातील जिवंत वीज वाहिनीचा प्रवाह लोखंडी जिन्यात येऊन मोरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. कोपर रोड महावितरणच्या साहाय्यक अभियंत्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांना पालिका पथदिव्यांच्या दोन खांबांमधील सिंगल फेज टू केबल आणि जीआय केबल लोखंडी जिन्याला चिकटलेली आढळली. या केबलचे इन्शुलिन निघाले होते. लोखंडी पाईपला वीज प्रवाहाच्या धक्क्याच्या खुणा दिसून आल्या आहेत.

Story img Loader