लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी गांजा विक्री, मद्य सेवन, गावठी मद्य विक्रीचे अड्डे पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक आणि विष्णुनगर पोलिसांची गस्त वाढल्याने बंद झाले आहेत. त्यामुळे गांजा, गावठी, विदेश मद्य सेवन करणाऱ्यांनी आता डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर मधील जुनी भोईरवाडी येथील जुन्या टेलिफोन एक्सचेंजच्या पाठीमागील भागातील गांजा सेवन, तस्करी अड्ड्यावर आपला मोहरा वळविला आहे.

महाराष्ट्रनगर मधील जुनी भोईरवाडी येथे जुने टेलिफोन एक्सचेंजचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या पाठीमागील बाजुस १५ हून अधिक गांजा सेवन करणारे, गांजाची तस्करी करणारे या भागात दररोज रात्रभर तळ ठोकून असतात. हा गांजा सेवन, तस्करीचा जुना अड्डा आहे. हा अड्डा वर्दळीच्या ठिकाणी आणि नागरी वस्तीत आहे. रहिवाशांची विशेषता महिला, तरूणींची या भागातून येजा असते. त्याची कोणतीही भीती न बाळगात गांजाचा अड्डा राजरोस सुरू असतो, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

एक स्थानिक हा गांजा अड्डा चालवितो. यापूर्वी विष्णुनगर पोलिसांनी येथे जुजुबी कारवाई केली आहे. कारवाईनंतर पुन्हा दोन दिवसांनी हा अड्डा सुरू झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. माणकोली पूल, खाडी किनारची झुडपे याठिकाणची पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे अचानक रात्रीच्या गस्तीसाठी शहराच्या विविध भागात फेरफटका मारत आहेत.

त्यांच्या तावडीत कोणी मद्यपी, गांजा सेवन करणारा सापडला की भर रस्त्यात ते त्यांना वर्दीचा झटका देतात. मागील दोन महिन्यांपासून हा जाहीर कार्यक्रम सुरू असल्याने अड्डे चालकांनी धसका घेतला आहे. डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी गांजा सेवनाचे अड्डे बंद झाल्याने या अड्ड्यावरील गांजा सेवन करणारे आता महाराष्ट्रनगरमधील जुनी भोईरवाडी टेलिफोन एक्सचेंजच्या पाठीमागील भागात येऊन तळ ठोकत आहेत. पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने याठिकाणी रात्रीच्या वेळेत अचानक छापा मारून या अड्डयाचा चालकांसह इतरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांची आहे.

विदेशी मद्य अड्डा

देवीचापाडा येथे हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजुस एका किरणा दुकानाजवळ मच्छिंद्र चिमण पाटील उर्फ मच्छ्या नावाचा इसम विदेशी दारू आपल्या घराच्या मोकळ्या जागेतून दिवसभर विकतो. याठिकाणी परिसरातील मद्य सेवन करणाऱ्यांची गर्दी असते. रात्री याठिकाणी रांगा लावून मद्य सेवन करणारे मद्य पितात. विदेशी दारूचा नकली माल याठिकाणी चढ्या दराने विकला जातो. या माध्यमातून शासनाचे आर्थिक नुकसान होते. काही वर्षापासून सुरू असलेल्या या मद्य अड्ड्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. याविषयी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. पण पोलिसांनी हा अड्डा कायमस्वरुपी बंद होण्याच्या दृष्टीने कारवाई न केल्याने हा विदेश मद्याचा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही या अड्ड्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.