ठाणे – येथील कोलशेत भागात शनिवारी दुपारी रस्ते रुंदीकरण कामात बाधित होत असलेले झाड हटविताना विद्युत वहिनी तुटून एका गृहसंकुलातील ९०० ते ९५० सदनिकांचा वीज पुरवठा खंडीत झाला. दुरुस्ती कामासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागला, तोपर्यंत रहिवाशांचे हाल झाले. ठाणे येथील कोलशेत भागात व्रज ग्रीन व्हॅली या नावाचे गृहसंकुल आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत कोपरमध्ये भाजपच्या कमळ चिन्हाला शिवसैनिकांनी काळे फासले, दोन शिवसैनिकांवर गुन्हा

या गृहसंकुल परिसरात महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात बाधित होणारे झाड हटविण्याचे काम शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुरू होते. त्यावेळी भूमीगत विद्युत वाहिनीला धक्का बसून त्या तुटल्या आणि यामुळे व्रज ग्रीन व्हॅली या गृहसंकुलाचा वीज पुरवठा खंडीत झाला. या बाबत माहिती मिळताच, महावितरण विभागाने घटनास्थळी घेऊन विद्यूत वाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले. हा वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे गृहसंकुलातील ९०० ते ९५० रहिवाशांना फटका बसला. वीज वहिनी दुरुस्ती काम पूर्ण करून एक ते दीड तासाने परिसराचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Story img Loader