ठाणे : भिवंडी महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा ८९७ कोटी ६९ लाख रुपयांचा कोणताही कर दरवाढ नसलेल्या अर्थसंकल्प आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला असून त्यामध्ये भिवंडीकरांचा प्रवास खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करणे, पालिकांच्या वास्तुंवर वीज निर्मीती प्रकल्प उभारणे, रुग्णालयात उपचारासाठी खाटांची व्यवस्था करणे आणि शंभर दशलक्ष पाणी पुरवठा योजना राबविणे, असा संकल्प सोडण्यात आला आहे. शिवाय, भिवंडीतील पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि शहरात प्राणवायुचे प्रमाण वाढावे, या उद्देशातून शासनाच्या अटल आनंद घन वन प्रकल्पांतर्गत शहरभर वृक्षांची लागवड करण्याची योजना अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.

भिवंडी महापालिकेचा सन २०२२-२३ चे सुधारीत अंदाजपत्रक ८८७ कोटी ६४ लाख रुपयांचे आणि सन २०२३-२४ या वर्षाचा उत्पन्न आणि प्रारंभिक शिल्लकेसह ८९७ कोटी ६९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकार दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्पात ८९७ कोटी ५८ लाख रुपयांचा महसुली व भांडवली खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे ११ लाख ६२ हजारांच्या शिल्लकेचा हा अर्थसंकल्प आहे. पाणी पुरवठा योजना, मलनिसारण प्रकल्प, दुर्बल घटकांसाठी योजना, अग्निशमन आणि आपती व्यवस्थापन विभाग, महिला व बाल कल्याण योजना, दिव्यांग कल्याण योजना, वृक्ष संवर्धन योजना, शिक्षण विभाग योजना, परिवहनचे प्रकल्प, अशा नऊ विभागात हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे.

Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

हेही वाचा >>> ठाणे : वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीच्या कंपनीत चोरी

मलनिसारण प्रकल्पासाठी आवश्यक एसटीपी कार्यान्वीत करणे, शहरात स्मशानभुमीमध्ये गॅस दाहीनीची सुविधा उपलब्ध करून देणे, महापालिकेचा ३० खाटांचा दवाखाना (बीजीपी दवाखाना) कार्यान्वीत करणे, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाची निगा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, सिमेंट कॉक्रिट रस्ता तयार करणे, कै. परशुराम धोंडु टावरे क्रीडासंकुल सुशोभिकरण करणे, महापालिका शाळा इमारतींचे बळकटीकरण करणे व बेंच पुरविणे, स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करणे, समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरीता थेरपी सेंटर तयार करणे व साहित्य पुरविणे, ऑडीओ लायब्ररी तयार करणे आणि पथ विक्रेता आत्मनिर्भर अशा योजना आणि प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद ठेवण्यात आलेली आहे.

वीज निर्मीती

ठाणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील छतावर १०० के डब्लु.पी क्षमतेचा सौर वीज प्रकल्प उभारण्यात आलेला असून त्याठिकाणी सरासरी दरमहा ११ हजार युनिट वीज निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेच्या दरमहा वीज देयकात १ लाख १५ हजाराची बचत होत आहे. याच धर्तीवर पालिकेच्या इतर वास्तुंवर सौर वीज प्रकल्प राबवून त्यातून वीज निर्मीती करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : आला उन्हाळा…,घरातील विद्युत तारा तपासा; आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर टोरंटचे ग्राहकांना आवाहन

पाणी पुरवठा योजना

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एकात्मिक पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. १ अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांपैकी दोन टाक्या वापर सुरु झाला असून ‌आणखी दोन टाक्यांचा वापर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. शिवाय, शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी भातसा धरणातून १०० दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजुर झालेला असून हे वाढीव पाणी शहरवासियांपर्यंत पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत हे प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यात महापालिका हिस्सापोटी तरतुद ठेवण्यात आली आहे.  

सिमेंट काँक्रीटचे रस्ते

भिवंडी शहरातील एकूण ५० रस्त्यांपैकी २५ रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या निधी वापरण्यात आला आहे. उर्वरित रस्तेही काँक्रीटचे करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. तशी घोषणा पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

पालिकेने केलेली उल्लेखनीय कामे

महापालिका शाळांच्या इमारतींचे बांधकाम संरचनात्मक परिक्षण करून दुरुस्ती केली आहे. अग्निशमन विभागाकरीता नवीन दोन अत्याधुनिक वाहने, गणवेश आणि साधनसामुग्री खरेदी करण्यात आलेली आहे. नाना नानी पार्क येथे बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. नझराना टॉकीज, संतोष ज्यूस सेंटर ते तीनबत्ती जंक्शन व गुलजार कोल्ड्रींक हाऊस पर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) निधी मधुन. बी. जी. पी. रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि चार नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थीना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. शहरातील महिला व मुलींकरीता पुढीलप्रमाणे योजना राबिवण्यात आल्या आहेत.