लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: येथील विवेकानंद सेवा मंडळातर्फे शहराच्या विविध भागात अडीचशे रोपांच्या लागवडीचा संकल्प केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवली शहर हिरवेगार करण्याचा मंडळाचा मानस आहे.

वाढत्या विकासाबरोबर आणि नवीन गृहप्रकल्पांमुळे शहराच्या विविध भागातील, वर्दळीच्या रस्त्यांवरील झाडे तोडण्यात आली आहेत. वाढत्या उष्णतामानामुळे आता झाडांची गरज वाटू लागल्याने विवेकानंद सेवा मंडळाने विविध प्रकारच्या अडीचशे झाडांची लागवड डोंबिवली शहराच्या विविध भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत सोमवारी ठाकुर्लीतील रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या बारावी वहिनी येथे १७५ रोपे लावण्यात आली.

आणखी वाचा-डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकापासून ५० मीटर अंतरावर रिक्षांना मज्जाव, कोंडी टाळण्याचा वाहतूक विभागाचा प्रयत्न

ठाकुर्ली रेल्वे हद्दीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम रेल्वेच्या विशेष सुरक्षा दलाचे अधिकारी शकील खान, अजय संसारे यांच्यासह डोंबिवली सायकल क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर, श्री लक्ष्मीनारायण संस्थेचे संस्थापक माधव जोशी, श्री गणेशमंदिर संस्थानचे सचिव प्रवीण दुधे, विवेकानंद सेवा मंडळाचे अनिल मोकल, चिऊ पार्कचे डॉ. प्रल्हाद देशपांडे, दीपक काळे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. श्रेया भानप, डॉ. अंजली रत्नाकर, प्रा. मीनल मांजरेकर, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, जाई मांजरेकर, शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी, निसर्गप्रेमी डोंबिवलीकर, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांच्या उपस्थितीत झाला.
 
मंडळाचे अनिल मोकल यांनी सर्व सदस्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. या उपक्रमास तांत्रिक मार्गदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले यांनी केले. या उपक्रमाकरिता ग्रेन अँड प्रोव्हिजन मर्चंट असोसिएशन, मधुमालती एंटरप्राईजेस आणि दिपक काळे यांनी आर्थिक सहकार्य केले. रोटरी क्लब आँफ डोंबिवली पश्चिमतर्फे चिऊ पार्कतर्फे काही झाडांची रोपे उपलब्ध करण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resolution of harit dombivli by vivekananda seva mandal mrj
Show comments