ठाणे : शहर रंगवण्यासाठी ठाणे महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या पडले येथील शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बेरंग झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. दिवा येथील पडले गाव भागातील महापालिकेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या १०५ विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक शिकवत असून या शाळेत मागील तीन महिन्यांपासून एकही पूर्णवेळ शिक्षक नसल्याचे समोर आले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करत तत्काळ पूर्णवेळ शिक्षक नेमण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.

हेही वाचा >>> सनद प्रकरणावरून उल्हासनगर पालिकेचीच कोंडी; अपुऱ्या माहितीवरून दिलेल्या पत्रामुळे पालिकेची अडचण

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…

दिवा-शीळ हद्दीतील पडले गावातील शाळा क्र. ९० मध्ये आढळून आले आहे. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात आधारकार्ड शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी ही बाब उघडकीस आली. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे १०५ विद्यार्थी शिकत असून गेल्या तीन महिन्यात येथे एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत असून या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी येथील एकमेव शिक्षकांशी बोलून अडचणी जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले असल्याची भावना येथील नागरिकांनीही बोलून दाखवली. केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ या शाळेत आवश्यक शिक्षक वर्ग नियुक्त करण्याची तसेच सोयी – सुविधा पुरवण्याची सूचना केली.

शहरात रंगरंगोटीसाठी १०३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे, याचा आनंदच आहे, पण शाळांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बेरंग करू नका.

– संजय केळकर, आमदार.