मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहने चालवणे म्हणजे अपघातांना आयतेच निमंत्रण. नववर्ष स्वागताच्या रात्री असे अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत असते. हे अपघात टाळण्यासाठी मीरा-भाईंदर वाहतूक पोलिसांनी आगळीच शक्कल लढवली आहे. शहरातील बार आणि रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मद्यपाटर्य़ामधून मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडलेल्या ग्राहकांना घपर्यंत सोडण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनी बारमालकांवर सोपवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाताळ आणि त्याला जोडूनच येणारे नववर्ष या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरातील बार आणि रिसॉर्ट मालक सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची मोठय़ा प्रमाणात जाहिरात सध्या करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये मद्याची रेलचेल असणार हे उघडच आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. नववर्ष स्वागत पाटर्य़ामध्ये सहभागी होणारे ग्राहक यथेच्छ मद्यपान करणार आणि त्याच अवस्थेत वाहन चालवणार हे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शहरातील सर्व बार, परमिट रूम आणि रिसॉर्ट मालकांना या मद्यपींबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

ग्राहक बाहेर पडताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणार नाही याची दक्षता बारमालकांनाच घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित ग्राहकाला पर्यायी चालक देणे अथवा त्याला रिक्षा तसेच टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनी बारमालकांवर सोपवली आहे. याशिवाय बारमध्ये अथवा बारच्या बाहेर मद्यपींमध्ये आपसात कोणतेही वादविवाद होणार नाहीत, महिलांची छेड काढली जाणार नाही, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याबाबतची दक्षता घेण्याची जबाबदारीही बारमालकांवरच आहे.

याव्यतिरिक्त मद्यपार्टी आयोजित करणाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्ही लावणे, येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी योग्य पार्किंग व्यवस्था ठेवणे तसेच एखादी घटना घडल्यास त्याची तातडीने माहिती पोलिसांना देणे याबाबतच्या सूचना बारमालकांना देण्यात आल्या आहेत.

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून मद्य पिऊन वाहने चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. नववर्ष स्वागत दिनापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांकडे अत्याधुनिक श्वास तपासणी यंत्रे (ब्रीद अ‍ॅनेलायजर) देण्यात आली आहेत. या यंत्राच्या साहाय्याने वाहनचालकांनी मद्यप्राशन केले आहे का तसेच त्याची पातळी किती आहे याची तपासणी केली जाणार आहे. या यंत्रात वाहनचालकांची छायाचित्रे घेण्याची सुविधादेखील आहे. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी दिली.