कोणतीही योजना परिपूर्ण नसते. त्यात उणिवा असतात. सूचनांद्वारे त्या दुरुस्त करता येतात. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केलेली ‘कर्तव्य’ योजनाही त्याला अपवाद नाही. ठाण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती.  मात्र या योजनेकडे सपशेल पाठ फिरूवून ज्येष्ठ नागरिकांनी संवादाचे दोरच कापून टाकले आहेत, हे चिंताजनक आहे. आत्ममग्न अवस्थेतून बाहेर येऊन या गोल्डन जनरेशनने आत्मपरीक्षण करण्याची वेळ  आहे..

वृद्धापकाळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत अविभाज्य काळ असून सगळ्यांना आयुष्यातील या टप्प्यातून जावे लागणार आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे समाजातील वृद्धांची संख्या वाढू लागली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ज्येष्ठांचा सन्मान करताना या पिढीचा गोल्डन जनरेशन असा उल्लेख केला आहे. समाजाला दिशा देणाऱ्या या पिढीला अनेक वेळा मानसिक आणि शारीरिक आजार, घरच्यांचे दुर्लक्ष आणि अन्य वेगवेगळ्या कारणाने मानहानीचा सामना करावा लागतो. काही वेळा घरच्यांकडून होणाऱ्या अपमानकारक वागणुकीमुळे त्रस्त होऊनही कौटुंबिक प्रतिष्ठा विचारात घेऊन ते सर्व प्रकारचा त्रास सहन करीत असतात. या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घ्याव्यात यासाठी ठाणे पोलिसांनी कर्तव्य या महत्त्वाकांक्षी योजनेची ऑगस्ट महिन्यात सुरुवात केली. ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन, मोबाइल अ‍ॅप्स आणि त्यांच्या माहितीचे संकलन करून त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न  करणे हा या योजनेमागचा उद्देश होता. ज्येष्ठ नागरिकांना एकटे वाटू नये, त्यांच्या समस्या पोलिसांपर्यंत पोहचाव्यात. त्याना आजारपणात  उपचारांसाठी मदत व्हावी यासाठी पोलिसांकडून या योजनेमार्फत प्रामाणिक प्रयत्न सुरू करण्यात आले. काहींसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असताना ठाण्याच्या मध्यवर्ती भाग असलेला नौपाडासारख्या भागामध्ये मात्र या योजनेकडे ज्येष्ठ नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. आम्हाला या उपक्रमाची गरज नाही, असा सूरयेथील बहुतेक ज्येष्ठ नागरिकांनी लावला आहे. शहरातील दुसरी परिस्थिती पाहिल्यास अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक राहत असून त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांना पुढाकार घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या उपक्रमांसाठी पोलीस प्रशासनाबरोबर महापालिका यंत्रणांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. आयुष्यभर सुखदुखाचे बरेवाईट अनुभव घेतलेल्या या गोल्डन जनरेशनची सेकंड इनिंग अधिक सुखकर होण्यासाठी सगळ्याच पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. तशीच ज्येष्ठांनीही या उपक्रमांना पाठिंबा देण्याची गरज आहे.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थानक परिसरातील एका पदपथावर एक बेघर व्यक्ती पडली होती. वय साधारण ७० च्या आसपास, दाढीचे केस वाढलेले, अनेक दिवस अंघोळ नसल्यामुळे शरीराचा दरुगधी येत होती. शिवाय पायाला मोठी जखम झालेली. या जखमेमुळे त्या व्यक्तीला हलणेही कठीण होते. ठाणे सिटीझन व्हाइस संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी या वृद्धाला मदत करण्याचे ठरवले. पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती देऊन या वृद्धाला ठाण्याच्या एका मोठय़ा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला प्रचंड जखम होऊन त्यात गॅगरिंग होण्यास सुरुवात झाली होती. अत्यंत कठीण प्रसंगी या संस्थेमधील व्यक्तींनी या वृद्धाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. डॉक्टरांनीही आपल्या परीने प्रयत्न केले. या व्यक्तीवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्याची संपूर्ण स्वच्छता करून त्यांना बरे करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अत्यंत वाईट प्रसंगातून वाचलेल्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. पुढे काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र आयुष्यातील शेवट रस्त्यावर अत्यंत वाईट पद्धतीने होण्यापासून त्यांची सुटका झाली होती. असाच दुसरा प्रसंग ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये घडला. या भागामध्ये पावसामध्ये एक ८० वर्षांचा वृद्ध भिजत असल्याचे ठाणे सिटीझन व्हाइसच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. पावसामध्ये भिजल्यामुळे या वृद्धाला प्रचंड ताप आला होता. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे पाठवण्यात आले. या भागात गेल्यानंतर हा व्यक्ती उत्तर प्रदेशमधील एका गावाचे नाव घेत असल्याचे तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी उत्तर प्रदेशातील त्या गावामधील गुगवलवरून संपर्क करत या व्यक्तीच्या घरच्यांचा शोध घेतला. कोपरखैरणे येथून ही व्यक्ती राहत्या घरातून हरवली होती. या प्रकरणी हरवल्याचा गुन्हाही दाखल होता. घरच्यांची भेट झाल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाला काहीसा दिलासा मिळाला. अशाच प्रकारचा अनुभव या संस्थेच्या मंडळींना वर्तकनगर येथे आला. एक ज्येष्ठ नागरिक दारूच्या व्यसनामुळे नेहमी घरापासून दूर राहत होता. घरामध्ये असलेल्या मुलाने त्याला घराबाहेर काढल्याचे या संस्थेच्या मंडळींना समजले. या प्रकरणी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या पिता पुत्रांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली असून आता हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या घरी राहू लागले आहेत. अशा  बेघर ज्येष्ठांसाठी ठाणे शहरामध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

आत्ममग्न, चिंताग्रस्त  

शहरातील ज्येष्ठांच्या समस्या लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. याच बरोबरीने अनेक गुन्हेगारी घटनाही ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये घडताना दिसून येत होत्या. सोनसाखळी खेचणे, दरोडा, जीवघेणा हल्ला अशा अनेक समस्यांचा सामना ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो.  ते टाळण्यासाठी ‘कर्तव्य’ योजना आहे. १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरामध्ये असलेले ज्येष्ठ नागरिक हे गोल्डन जनरेशन असून त्यांचा सन्मान करा असा सल्ला यावेळी त्याने दिला होता. पोलीस प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक, मोबाइल अ‍ॅप आणि सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये पोलीस मित्राच्या सहाय्याने त्यांचे सर्वेक्षण सुरू असताना अनेक धक्कादायक अनुभव पोलीस मित्रांना येऊ लागले आहेत. एका आजारावर उपचार करण्यासाठी पुढे यावे आणि भलतीच व्याधी आढळून यावी असा हा प्रकार आहे. तरुण पिढी जशी ज्येष्ठांना समजून घेण्यात कमी पडतेय, तसेच ज्येष्ठ नागरिकही नव्या पिढीशी संवाद साधण्यात कमी पडताहेत. अशा प्रकारे काहीशा आत्ममग्न असणाऱ्या या पिढीनेही आता आत्म परीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader