ठाणे : गेल्या काही वर्षांपासून पावसाचे पाणी साचणाऱ्या सखल भागांचा अभ्यास करून आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांना फारसे यश मिळत नसतानाच, ठाणे महापालिकेने या भागांचा आता पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासादरम्यान प्रथमदर्शनी आढळून आलेल्या बाबींच्या आधारे पालिकेकडून काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे काही प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकेल, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी कायमस्वरुपी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याची चाचपणी करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सखल भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. त्याचा परिणाम, शहरातील वाहतुकीवर होतो. तसेच नागरिकांना या भागातून ये-जा करणे शक्य होत नाही. गेल्या काही वर्षांपासून या सखल भागांचा अभ्यास करून त्याठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात काही ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी गटारांवर जाळीची झाकणे बसविण्यात आली आहेत. परंतु या उपाययोजनांना फारसे यश मिळताना दिसत नाही. असे असतानाच, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील सखल भागांचा नव्याने अभ्यास करून त्याठिकाणी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?

हेही वाचा – टिटवाळ्यातील म्हाडाच्या भूखंडावरील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा निर्णय

ठाणे महापालिका अधिकाऱ्यांमार्फत सखल भागांमध्ये कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा अभ्यास करण्यात येत असून त्याचबरोबर आयुक्त बांगर हेसुद्धा स्वत: सखल भागांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे. त्यांनी नुकताच ठाणे शहरातील वंदना एस.टी. डेपो परिसर, जांभळीनाका येथील पेढ्या मारुती परिसर, भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे रेल्वे स्थानक परिसर या भागांचा पाहाणी दौरा केला. त्यात काही ठिकाणी पंपाद्वारे उपसण्यात येणारे पाणी परिसरातील नाल्यात सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी याठिकाणी काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार पंपाने उपसा करण्यात येणारे पाणी नाल्याच्या मागील टोकाऐवजी पुढील टोकाकडे सोडण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

तात्पुरत्या उपाययोजना

वंदना एस.टी. डेपो परिसरापासून ते गजानन महाराज मठापर्यत असलेल्या सर्व पावसाळी गटारांवरील जाळ्या काढून वाहून आलेला कचरा दैनंदिन साफ करणे. जांभळी नाका येथील पेढया मारुती परिसरातील पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी या ठिकाणी खोल खड्डा करून पंपाच्या सहाय्याने पाणी नाल्याच्या खालच्या भागात सोडण्यात येणार आहे. तलावपाळीतून ओसंडून वाहणारे पाणी पेढया मंदिराच्या बाजूच्या नाल्यामध्ये सोडण्याऐवजी दुसऱ्या बाजूच्या नाल्यात सोडणे आणि या भागातील नाल्यांतील गाळ काढण्याबरोबरच चेंबर्सची संख्या वाढविणे. चिखलवाडी परिसरातील पंपाद्वारे काढण्यात येणारे पाणी परिसरातील रस्त्याऐवजी रस्ता ओलांडून नवीन कोपरी पुलाच्या बाजूच्या पावसाळी गटारामध्ये सोडणे. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोर चिखलवाडी आणि मनोरुग्णालयाकडून येणारे दोन नाले एकत्र येतात. मेंटल हॉस्पिटलकडून येणाऱ्या नाल्याचा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास चिखलवाडीकडून येणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे दोन्ही नाले ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी वक्राकार पद्धतीने तात्पुरती भिंत बांधण्यात येणार आहे.

हेही वाचा – व्यापार आणि साठा परवाना न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडोंमपा उगारणार कारवाईचा बडगा

ठाणे शहरात पाणी साचणाऱ्या भागांचा अभ्यास करून त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात का, याचा आढावा घेण्यात येत आहे. त्याआधारे याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात आता उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढणे आणि चेंबर्सची संख्या वाढविणे अशी कामे करण्यात येणार आहेत. अशा उपाययोजनांमुळे काही प्रमाणात पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. – अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महापालिका