ठाणे- यंदाच्या वर्षीचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात ९७.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, जिल्ह्यातील ६४१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच १३१ शाळांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना प्रादूर्भावामुळे गेले दोन वर्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत होते. करोना प्रादूर्भावाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही वर्ग सुरु करण्यात आले होते. परंतू, करोना प्रादूर्भाव वाढताच हे वर्ग पून्हा बंद करावे लागत होते. त्यामुळे आनलाइन की, ऑफलाइन यामध्ये विद्यार्थ्यांची कोंडी होत होती. आणि त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. त्यात, यंदा करोना प्रादूर्भाव ओसरल्यामुळे राज्य मंडळाने दहावीची परिक्षा लेखी स्वरुपात घेतली.

त्यामुळे, दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही हुरहूर लागून राहिली होती. अखेर शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्याचा यंदाच्या वर्षी ९७.१३ टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात दोन टक्क्यांनी घसरण झाली असली तरी जिल्ह्यातील ६४१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. ६४१ शाळांपैकी ४६४ शाळा या शहरी भागातील तर, १७७ शाळा या ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातील ४६४ शाळांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच १३१ शाळांचा समावेश आहे. तर, सर्वात कमी म्हणजेच २२ शाळा या उल्हासनगर शहरातील आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही दहावीच्या परिक्षेत चांगले गुण प्राप्त केले आहे. या भागातील १७७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच ५४ शाळांचा समावेश आहे. तर, शहापूर तालुक्यातील ४०, भिवंडी ३१, मुरबाड २८ आणि कल्याण तालुक्यातील २४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

शहर निहाय्य १०० टक्के निकाल आलेल्या शाळांची संख्या
शहर शाळांची संख्या
ठाणे १३१

कल्याण – डोंबिवली ११७

नवी मुंबई ८०

मीर भाईंदर ७९

भिवंडी ३५

उल्हासनगर २२
एकूण ४६४