रिक्षातील गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने संताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार : रिक्षात लावलेल्या गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने नालासोपारा येथे एका तरुणीला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर रिक्षाचालक फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या समेळपाडा येथे राहणारी वर्षां सारंगे (२५) ही तरुणी शनिवारी रात्री आपल्या मित्रासह कामावरून परत येत होती. नालासोपारा येथून वर्षां आणि तिचा मित्र शैलेश यांनी टाकीपाडा येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षामध्ये असलेल्या ध्वनिसंचाद्वारे मोठय़ाने गाणी वाजवण्यात येत असल्याने वर्षांने तो बंद करायला सांगितला. रिक्षाचालकाने टेप बंद केला आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर रिक्षाचालकांशी गप्पा मारण्यासाठी गेला. मात्र त्याने रिमोटने पुन्हा गाणी सुरू केली. हा सर्व प्रकार सहन न झाल्याने वर्षांने रिक्षावाल्याला दम देण्यास सुरुवात केली. त्यामुळे रिक्षावाल्याने शिवीगाळ करत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या छातीवर आणि पोटावर लाथा-बुक्क्या मारल्या. त्यानंतर तो पळून गेला. वर्षांने तातडीने नालासोपारा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी या रिक्षाचालकाविरोधात गुन्हे दाखल केले असून त्याचा शोध सुरू केला आहे, असे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले.