डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात गुरुवारी सकाळी दोन तरुणांनी एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने रिक्षा चालकाच्या हाताला गंभीर दुखापत करून घटनास्थळावरून पळून गेले.

सिताराम शेवाळे (४५, रा. दावडी, कल्याण पूर्व) असे तक्रारदार रिक्षा चालकाचे नाव आहे. रिक्षा चालक शेवाळे गुरुवारी सकाळी सात वाजता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा घेऊन आले होते. इंदिरा चौकात रिक्षा उभी करून जवळच्या चहाच्या टपरीवर ते चहा पिण्यासाठी पायी चालले होते. तेवढ्यात दोनजण स्कुटरवर बसून मानपाडा रस्ता दिशेने चालले होते.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Traffic jam on both lanes due to track closure on highway
महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय

हेही वाचा – डोंबिवलीत रविवारी पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे ‘बुक स्ट्रीट’; एक लाख पुस्तकांची रस्त्यावर मांडणी

स्कुटरच्या पाठीमागे बसलेल्या एका तरुणाने रिक्षा चालक शेवाळे यांच्या डोक्याला पाठीमागून जोराची चापट मारली. काही कारण नसताना चापट मारल्याने शेवाळे यांनी दुचाकी स्वाराच्या मागे धाऊन तू मला का मारलेस, असा प्रश्न केला. त्याचा राग दुचाकीवरील तरुणांना आला. ते दोघेही दुचाकी थांबून मारण्याचे कारण न देता शेवाळे यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी एका तरुणाने जवळील धारदार चाकू काढून रिक्षाचालक शेवाळे यांच्या हातावर वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या प्रकारानंतर दुचाकीस्वार तेथून पळून गेले.

हेही वाचा – ठाण्यात पुन्हा ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी

रिक्षा चालक शेवाळे यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शेवाळे यांना मारहाण सुरू असताना एकही सहकारी रिक्षा चालक त्यांची सोडवणूक करण्यासाठी पुढे आला नाही.

Story img Loader