कल्याण: कल्याण पश्चिमेतील जोशी बाग येथे सोमवारी दुपारी याच भागातील एका टोळक्याने एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अजय विष्णु पवार (२७, रा. पंडीत चाळ, जोशी बाग, कल्याण) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. दादु लिये, उमेश लिये आणि भावेश या आरोपींविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात अजय यांनी तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवासी वाहतूक करुन झाल्यानंतर दुपारच्या वेळेत अजय पवार घरी भोजनासाठी चालले होते. यावेळी जोशी बागेतील थोरे इमारती जवळ रस्त्यामध्ये अजयचा मित्र युवराज इंदापूरकर उभा होता. अजयने त्याला रस्त्याच्या बाजुला उभे राहण्यास सांगितले. यावेळी बाजुलाच उभे असलेल्या आरोपी दादु, उमेश आणि भावेश यांना अजयने युवराजला शिवीगाळ करुन भांडण करण्यास सुरुवात केली आहे की काय असे वाटले. त्यामुळे कसलीही शहानिशा न करता आरोपींनी रिक्षा चालक अजयला लाथाबुक्की, बॅटने मारहाण केली. डोक्यावर गंभीर जखम करण्यात आली.
मारहाणी नंतर आरोपी पळून गेले. जोशी बागेत भाई म्हणून मिरविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. -जयराज देशमुख तहसीलदार