परिवहन समितीविना प्रलंबित असलेला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षांपूर्वी परिवहन सेवेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेली पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांची समिती पुन्हा गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘टीएमटी’चे रखडलेले प्रस्ताव मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरवाढीचा प्रस्तावही लवकरच या समितीच्या मान्यतेसाठी ठेवला जाईल, अशी माहिती व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.  
ठाणे परिवहन समितीतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने काही सदस्य निवृत्त झाले आहेत. या जागांवर नव्या सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूझालेली नाही. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, महापालिकेत सुरू असलेल्या राजकारणामुळे समित्यांच्या नेमणुका न्यायालयीन फेऱ्यात सापडल्या आहेत.स्थायी समिती आणि काही मोजक्या प्रभाग समित्यांचा अपवाद वगळल्यास अन्य समित्यांची अद्याप स्थापना झालेली नाही. त्यात परिवहन समितीचा समावेश आहे.
ठाणेकरांच्या दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून टीएमटी बससेवेला महत्त्व आहे. उपक्रमाच्या कारभारातील ढिसाळपणाचे अनेक नमुने याआधी उघड झाले आहेत. त्यामुळे परिवहन समितीची नियुक्ती होणे आवश्यक मानले जाते. असे असताना नव्या सदस्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. समितीतील काही सदस्यांच्या निवृत्तीनंतर उरलेल्या पाच सदस्यांमार्फत समितीचा कारभार सुरू होता. मध्यंतरी, या सदस्यांमधून सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यात चार महिन्यांतच या सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे ही समिती जेमतेम चार महिनेच अस्तित्वात होती. मात्र, या घटनेला वर्ष उलटूनही अद्याप नवीन परिवहन समिती गठीत होऊ शकलेली नाही. यामुळे परिवहन सेवेतील महत्त्वाचे प्रस्ताव पुन्हा रखडले आहेत.

प्रस्ताव तयार
* ठाणे परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय
* किमान दोन रुपयांनी दरवाढीची शिफारस
* दोन वर्षांपूर्वी टीएमटीच्या बस तिकिटांच्या दरात वाढ
* डिझेल, सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने टीएमटीचे जमाखर्चाचे गणित फसू लागले
*‘टीएमटी’मधील कामचुकार आणि दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे व इतर महत्त्वाचे प्रस्ताव तयार
* पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समितीत आयुक्त, महापौर, विरोधी पक्ष नेता, स्थायी समिती आणि सभागृह नेता आदींचा समावेश  

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
indian railway video TT police man fight viral video
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित