परिवहन समितीविना प्रलंबित असलेला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षांपूर्वी परिवहन सेवेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेली पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांची समिती पुन्हा गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘टीएमटी’चे रखडलेले प्रस्ताव मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरवाढीचा प्रस्तावही लवकरच या समितीच्या मान्यतेसाठी ठेवला जाईल, अशी माहिती व्यवस्थापनातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
ठाणे परिवहन समितीतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने काही सदस्य निवृत्त झाले आहेत. या जागांवर नव्या सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूझालेली नाही. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, महापालिकेत सुरू असलेल्या राजकारणामुळे समित्यांच्या नेमणुका न्यायालयीन फेऱ्यात सापडल्या आहेत.स्थायी समिती आणि काही मोजक्या प्रभाग समित्यांचा अपवाद वगळल्यास अन्य समित्यांची अद्याप स्थापना झालेली नाही. त्यात परिवहन समितीचा समावेश आहे.
ठाणेकरांच्या दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून टीएमटी बससेवेला महत्त्व आहे. उपक्रमाच्या कारभारातील ढिसाळपणाचे अनेक नमुने याआधी उघड झाले आहेत. त्यामुळे परिवहन समितीची नियुक्ती होणे आवश्यक मानले जाते. असे असताना नव्या सदस्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. समितीतील काही सदस्यांच्या निवृत्तीनंतर उरलेल्या पाच सदस्यांमार्फत समितीचा कारभार सुरू होता. मध्यंतरी, या सदस्यांमधून सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यात चार महिन्यांतच या सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे ही समिती जेमतेम चार महिनेच अस्तित्वात होती. मात्र, या घटनेला वर्ष उलटूनही अद्याप नवीन परिवहन समिती गठीत होऊ शकलेली नाही. यामुळे परिवहन सेवेतील महत्त्वाचे प्रस्ताव पुन्हा रखडले आहेत.
टीएमटीची तिकीट दरवाढ लवकरच
परिवहन समितीविना प्रलंबित असलेला तिकीट दरवाढीचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-01-2015 at 12:44 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ride on a tmt bus may soon cost more