झाडावरून खाली पडल्यावर हातपाय मुरगळणे अथवा छोटी दुखापत झाली तर फारसे घाबरण्याचं कारण नसत. मात्र हीच दुखापत गंभीर स्वरूपाची झाल्यावर पायाखालची वाळू सरकते. असाच एक लहान मुलगा झाडावरून खाली पडून उजव्या हाताचे मनगट आणि कोपऱ्याची हाड तुटून बाहेर आले. गंभीर दुखापत झालेल्या मुलाच्या हाताची ठाणे जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने मुलाच्या व पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.

ठाण्यात राहणाऱ्या अंकुर हा १३ वर्षाचा मुलगा (नाव बदलून) आंब्याच्या झाडावर चढला.झाडाचा अंदाज न आल्याने तोल जाऊन तो खाली पडला. शरीराचा सार्वभार हातावर आल्याने उजव्या हाताला गंभीर इजा होऊन मनगट आणि कोपरा कडील हाड मोडले होते. वेदना सहन करण्यापलीकडे होत्या.त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणे खिशाला परवडणारे नव्हते. ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचार चांगले होत असल्याचे अंकुरच्या कुटुंबाला सांगण्यात आले. त्यानुसार सोमवारी रुग्णालयात दाखल केलं. वरिष्ठ अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ विलास साळवे व टीमने अंकुरवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. जवळपास दोन तास ही शस्रक्रिया चालली होती.याबाबत डॉ साळवे यांना विचारले असता ते म्हणाले आमच्याकडे अनेक अवघड शस्रक्रिया नेहमीच होत असतात. अपघातातील मल्टिपल फ्रँक्चर झालेले रुग्णा दाखल होतात. यात वाहानाची धडक बसून हाडे मोडलेले, गाडीच्या अपघातात वा रेल्वेत पडून जखमी झालेले रुग्ण येत असतात. अस्थिशल्य विभाग हा वीस खाटांचा असून दररोज बाह्यरुग्ण विभागात सरासरी सत्तर रुग्ण उपचारासाठी येतात. आठवड्याला आम्ही किमान पाच ते सात जटील शस्रक्रिया करतो असेही डॉ साळवे म्हणाले.

अंकुरच्या हाताला जबर मार लागून हाताची दोन्ही हाड एक्सरे मध्ये तुटलेली दिसत होती. त्यामुळे जोखमीची शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान रुग्णालयासमोर होते. अंकुर लहान असल्याने त्याच्या हाताला होणाऱ्या वेदनाही सांभाळायची होती. मात्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया यशस्वी केली. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांचेही सहकार्य मिळाले असल्याचे वरिष्ठ अस्थीव्यंग तज्ज्ञ डॉ. विलास साळवे यांनी सांगितले.दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यावर अंकुरच्या कुटुंबाने रुग्णालयाचे आभार मानले आहेत. शस्त्रक्रिया करते वेळी अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. आदेश रंगारी, वरिष्ठ अस्थिव्यंग तज्ञ डॉ. विलास साळवे, डॉ अजित भुसागरे, भुलतज्ञ् डॉ रुपाली यादव, मिलिंद दौंडेमामा, सिस्टर गायकर, भक्ती, ठाकरे मामा, मदन मामा यांनी अथक परिश्रम घेतले.

अंकुरच्या हाताची साधारण दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आला असता. परंतु जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी नेहमीच देवदूत बनून काम करत आहेत. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया ही सिव्हील रुग्णालयात होतात असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.